shreyas iyer: 80 धावांच परफेक्ट टायमिंग, मेगा ऑक्शनमध्ये वाढणार श्रेयसचा भाव, किती कोटीची बोली लागणार?

उद्या IPL च्या 15 व्या सीजनसाठी बंगळुरुमध्ये ऑक्शन पार पडणार आहे. या मेगा ऑक्शनच्या एकदिवस आधी श्रेयस अय्यरने (shreyas iyer) वेस्ट इंडिज विरुद्ध 80 धावांची तडाखेबंद खेळी केली.

shreyas iyer: 80 धावांच परफेक्ट टायमिंग, मेगा ऑक्शनमध्ये वाढणार श्रेयसचा भाव, किती कोटीची बोली लागणार?
वनडे पाठोपाठ टेस्टमध्ये श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) दमदार पदार्पण केलं आहे. नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आला होता.
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 6:36 PM

अहमदाबाद: उद्या IPL च्या 15 व्या सीजनसाठी बंगळुरुमध्ये ऑक्शन पार पडणार आहे. या मेगा ऑक्शनच्या एकदिवस आधी श्रेयस अय्यरने (shreyas iyer) वेस्ट इंडिज विरुद्ध 80 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्यामुळे उद्या होणाऱ्या लिलावात श्रेयस अय्यरचा भाव वाढू शकतो. संघ अडचणीत सापडलेला असताना श्रेयस अय्यरने ही कामगिरी केली आहे. श्रेयसने 111 चेंडूत 80 धावा करताना नऊ चौकार लगावले. वेस्ट इंडिज (West indies) विरुद्ध वनडे सीरीज सुरु होण्याच्या चार दिवस आधी श्रेयस अय्यर कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पहिल्या दोन वनडे सामन्यांना तो मुकला. आज थेट अर्धशतकी खेळी साकारुन, त्याने संघात जोरदार पुनरागमन केलं. दक्षिण आफ्रिकेतील तिन्ही वनडे सामन्यांमध्ये त्याला प्रभाव पाडता आला नव्हता. IPL ऑक्शनच्या एकदिवसआधी श्रेयसने ही खेळी केली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या लिलावात त्याला याचा आर्थिक लाभ मिळू शकतो.

मागच्या सीजनपर्यंत श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळायचा. त्याने आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्वही केले. मागच्यावर्षी खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस आयपीएलच्या पहिल्या सत्रात खेळू शकला नाही. त्यावेळी दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंतकडे सोपवण्यात आलं. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात संघात परतल्यानंतरही दिल्लीने त्याला कर्णधार बनवलं नाही. त्यामुळे त्याने दिल्लीचा संघ सोडला.

श्रेयस अय्यरवर उद्या मोठी बोली लागू शकते. अनेक फ्रेंचायजींची त्याच्यावर नजर आहे. कारण श्रेयसकडे फक्त फलंदाज म्हणून नाही, तर एक कॅप्टन म्हणूनही पाहिले जात आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी चुरस दिसू शकते. हे दोन्ही संघ नेतृत्वाच्या दृष्टीने त्याला आपल्या चमूत घेऊ शकतात.

80 runs Against west indies could increase money value of shreyas iyer in IPL Mega Auction 2022

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.