दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका?
Ind vs SA : टीम इंडियाला कसोटी सामन्याआधी मोठा झटका बसला आहे. टीम इंडिया सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे. यजमान संघासोबत भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. या कसोटी सामन्यासाठी उद्या टीम इंडियाचे खेळाडू रवाना होणार आहेत. पण या यादीत एका दिग्गज खेळाडूचे नाव नाहीये.
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया येथे टी-20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया आज तिसरा टी २- सामना खेळणार आहे. त्यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वात वनडे मालिका होणार आहे. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. कारण संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज या दौऱ्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
दुखापतीमुळे विमानप्रवास करु शकणार नाही
मोहम्मद शमी हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी विमानप्रवास करू शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही बॅडन्यूज असू शकते. कारण मोहम्मद शमी हा सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. वर्ल्डकपमध्ये ही त्यांने आपल्या कामगिरीने सर्वांचेच मन जिंकले आहे.
26 डिसेंबर पासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या संघाला यजमानांवर विजय मिळवायचा असेल तर त्याला चांगले बॉलर्स खेळवावे लागणार आहेत. पण त्याआधीच टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
मोहम्मद शमी दुखापतीमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा हा स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीतून अजून सावरलेला नाही. दुखापतग्रस्त असूनही तो आयसीसी वनडे विश्वचषक खेळला होता. 15 डिसेंबरला कर्णधार रोहित शर्मासोबत सर्व खेळाडूंना रवाना होणार आहे. पण यामध्ये शमीचे नाव नसल्याचं कळतं आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना वर्षाच्या अखेरीस 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे होणार आहे. दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पुढील वर्षी भारताचा हा पहिलाच सामना असणार आहे. 3 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.