माझ्या कहानीत खूप सारे व्हिलन, आता हरभजनसिंगच्याही टार्गेटवर बीसीसीआय, धोनीबद्दलही नाराजी?

त्यावेळेस सगळ्या गोष्टी धोनीच्या डोक्यावरुनही जात असाव्यात. त्यात काही बीसीसीआयचे काही अधिकारी मिसळलेले होते. त्यांना असं वाटत होतं की मी पुढे खेळू नये. आणि कप्तान म्हणूणही धोनीनं त्यांना सपोर्ट केला. अर्थातच कप्तान, कोच, किंवा टीम कधीच बीसीसीआयपेक्षा मोठी नसते.

माझ्या कहानीत खूप सारे व्हिलन, आता हरभजनसिंगच्याही टार्गेटवर बीसीसीआय, धोनीबद्दलही नाराजी?
Harbhajan Singh Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 10:37 AM

सचिन तेंडुलकरनं ज्या हरभजनसिंगला (Harbhajan Singh) त्याच्या ऑल टाईम बेस्ट क्रिकेट टीममध्ये जागा दिलीय, त्याच हरभजनसिंगच्या टार्गेटवर सध्या बीसीसीआय आहे. एवढच नाही तर महेंद्रसिंग धोनीबद्दलही (Dhoni) त्यानं नाराजीचा सूर लावलाय. हरभजनसिंगनं काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केलीय. त्यानंतर तो त्याच्या करिअरच्या अनेक घटनांबद्दल बोलता झालाय. अलिकडेच त्यानं झी न्यूजशी बोलताना काही घटनांना उजाळा दिलाय. बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांवर मोठे आरोप केलेत.

भज्जी नेमका काय म्हणाला? हरभजनसिंगचं करिअर मोठं राहिलं. 20 वर्षापेक्षा अधिक काळ तो क्रिकेटशी (Indian Cricket Team) संबंधीत राहिला. त्यातल्या अनेक चढउताराबद्दल बोलताना तो म्हणाला- लक माझ्यासोबत होती. काही जण होते जे माझ्यासोबत नव्हते. मी असही म्हणू शकतो की ते पूर्णपणे माझ्याविरोधात होते. अर्थातच त्याला कारण होता माझा खेळ. मी बेस्ट बॉलींग करत होतो आणि प्रदर्शनही शानदार होतं. मी 31 वर्षांचा होतो, त्यावेळेसपर्यंत 400 विकेट घेतलेल्या होत्या. त्यावेळेस माझ्या डोक्यात आणखी चार पाच वर्ष खेळण्याचा विचार होता. तसं झालं असतं तर मी आणखी शंभर दीडशे विकेट घेतल्या असत्या.

धोनीने बीसीसीआयला सपोर्ट केला भज्जी म्हणाला की, त्यावेळेस महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा कप्तान होता. मला असं वाटतं, त्यावेळेस सगळ्या गोष्टी धोनीच्या डोक्यावरुनही जात असाव्यात. त्यात काही बीसीसीआयचे काही अधिकारी मिसळलेले होते. त्यांना असं वाटत होतं की मी पुढे खेळू नये. आणि कप्तान म्हणूणही धोनीनं त्यांना सपोर्ट केला. अर्थातच कप्तान, कोच, किंवा टीम कधीच बीसीसीआयपेक्षा मोठी नसते.

धोनीला जरा जास्तच सपोर्ट माजी ऑफस्पीनर असलेल्या हरभजनसिंगनं म्हटलं की, इतर क्रिकेटर्सच्या तुलनेत धोनीला जास्त आणि बीसीसीआयचा चांगला सपोर्ट मिळाला. असाच सपोर्ट इतर खेळाडूंना मिळाला असता तर त्यानेही बेहतरीन खेळ केला असता. असं नव्हतं की, इतर खेळाडू हे बॉल स्विंग करायला विसरले होते किंवा बॅटींग करणे विसरले होते. प्रत्येक खेळाडूला वाटतं की, टीम इंडियाची जर्सी घालूनच रिटायर व्हावं. पण असं सगळ्यांसोबत होत नाही. तुम्ही व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, विरेंद्र सहवागसारख्या खेळाडूंना उदाहरण म्हणूण बघू शकता.

फिल्म की वेबसिरीज? अलिकडेच कपिल देव यांच्यावर फिल्म आलीय. धोनीवरही फिल्म येऊन गेलीय. हरभजनसिंगचीही अपेक्षा आहे की, त्याच्यावरही एखादी फिल्म किंवा बायोपिक, वेबसिरीज बनावी. तो म्हणाला- माझी अशी इच्छा आहे की माझ्या करिअरवरही एखादी बायोपिक फिल्म किंवा वेब सिरीज बनावी. कारण लोकांना माझीही बाजू कळावी. मी करीअरमध्ये काय केलं आणि इतरांनी माझ्यासोबत काय केलं हे लोक बघू शकतील. मी हे सांगू नाही शकत की माझ्या बायोपिकमध्ये व्हिलन कोण असेल. ह्या बायोपिकमध्ये एक नाही तर अनेक व्हिलन असतील.

टेस्टमध्ये भज्जीचे 417 विकेट हरभजनसिंग वयाच्या 41 व्या वर्षी संन्यास घेतला. त्यावेळेस ट्विटरवर त्यानं लिहीलं होतं- मी त्या खेळाला बाय बाय करतोय, ज्यानं मला आयुष्यातल्या सर्व गोष्टी दिल्या. सगळ्या चांगल्या गोष्टी संपत असतात. मी त्या सर्वांना धन्यवाद देतोय ज्यांनी 23 वर्षांचा हा प्रवास ‘बेहतरीन’ आणि ‘यादगार’ केला. भज्जीनं त्याच्या शानदार करिअरमध्ये 103 मध्ये 417 विकेट, 236 वन डे इंटरनॅशनल मॅचमध्ये 269 विकेट आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25 विकेट घेतलेल्या आहेत.

हे सुद्धा वाचा:

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांची प्रतिष्ठा पणाला, 6 जागा राखण्याचं आव्हान

VIDEO : रस्त्याच्या कडेला विजेच्या वेगाने धावताना दिसले माकड, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले, ‘पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक नक्कीच जिंकणार’

Mumbai Bank Election | मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी आज निवडणूक, पोलिसांचा चोख बंदोबस्त

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.