थोडी उसंत घेऊ द्या, एकावर्षात दोन IPL, माजी क्रिकेटपटूने सांगितला प्लान

इंडीयन प्रीमियरल लीग 2022 चा सीजन (IPL 2022) नुकताच संपला. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर याच आठवड्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.

थोडी उसंत घेऊ द्या, एकावर्षात दोन IPL, माजी क्रिकेटपटूने सांगितला प्लान
Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 1:10 PM

मुंबई: इंडीयन प्रीमियरल लीग 2022 चा सीजन (IPL 2022) नुकताच संपला. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर याच आठवड्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. आय़पीएलचा सीजन संपत असताना, IPL बद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. लवकरच एका वर्षात दोन आयपीएल स्पर्धा पहायला मिळतील, असा दावा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Akash Chopra) केला आहे. मागच्या काहीकाळात आयपीएलमध्ये बरेच बदल झाले आहेत, असं आकाश चोप्रा आपल्या युटयूब चॅनलवर बोलताना म्हणाला. “येणाऱ्या काळात आयपीएल आणखी मोठी स्पर्धा होणार आहे. हे अचानक घडणार नाही. याला पाच वर्ष लागू शकतात, मात्र हे नक्की घडेल” असं आकाश चोप्रा म्हणाले. एकावर्षात दोन आयपीएल स्पर्धा झाल्या, तर त्याचा फॉर्मेट कसा असेल? आयपीएलमध्ये आता 10 टीम्स आहेत. त्यामुळे सामन्यांची संख्या वाढेलच. आयपीएलचा कालावधी वाढल्यानंतर 94 सामने होऊ शकतात. दुसऱ्याफॉर्मेटमध्ये आयपीएलमधील संघ परस्पराविरोधात प्रत्येकी एक सामनाच खेळतील. आयपीएलचा हा हंगाम एक महिन्यातच संपेल.

रवी शास्त्रींच्या विधानाने सुरु झाली चर्चा

टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांच्या विधानाने एकावर्षात दोन आयपीएल स्पर्धांची चर्चा सुरु झाली आहे. “आयपीएल इतकं मोठं झालय की, तुम्हाला दोन आयपीएल स्पर्धा पहायला मिळतील. हेच भविष्य असून या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील” असं रवी शास्त्री म्हणाले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमी होईल

इंडियन प्रीमियर लीग बद्दलची क्रेझ ज्या पद्धतीने वाढलीय, त्यामुळे बऱ्याचदिवसांपासून ही चर्चा सुरु आहे. अलीकडेच आयसीसीचे चीफही म्हणाले होते की, “ज्या पद्धतीने लीग बद्दलची क्रेझ वाढलीय, ते लक्षात घेता आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमी होऊ शकतं. कसोटी सामन्यांची संख्याही कमी होईल”

यंदाच्या सीजनमध्ये किती सामने झाले?

यंदाच्या आयपीएल 2022 मध्ये 10 टीम्स सहभागी झाल्या होत्या. एकूण 74 सामने खेळले गेले. पहिलाच सीजन खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएलच जेतेपद पटाकवलं. टीवी रेटिंग्सच्या हिशोबाने यंदाच्या आयपीएलसाठी आकडे फार उत्साहवर्धक नाहीयत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.