PAK vs ENG: पाकिस्तानला लय भारी मिस्ट्री स्पिनर मिळाला, बेन स्टोक्स Abrar Ahmed चा चेंडू शोधत बसला VIDEO
PAK vs ENG: आपण कसं OUT झालोय, हेच स्टोक्सला कळल नाही. VIDEO मध्ये पहा.
लाहोर: पाकिस्तानच्या टीममध्ये एक नवीन मिस्ट्री स्पिनर आलाय. त्याने आपल्या डेब्यु कसोटी सामन्यात कमाल केलीय. या मिस्ट्री स्पिनरच नाव आहे, अबरार अहमद. अबरारच्या फिरकीसमोर इंग्लिश फलंदाजाच आज काही चाललं नाही. इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांनी अबरारच्या वळणाऱ्या चेंडूंसमोर शरणागती पत्करली. पाहुणा इंग्लंडचा संघ 51.4 ओव्हर्समध्ये 281 धावांवर ऑलआऊट झाला. अबरार अहमदने 22 ओव्हर्समध्ये 114 धावा देऊन 7 विकेट काढल्या. महत्त्वाच म्हणजे अबरारने इंग्लंडच्या सुरुवातीच्या 7 विकेट एकट्यानेच काढल्या. या 7 विकेट्समध्ये बेन स्टोक्सचा विकेट जबरदस्त होता. अबरारचा चेंडू इंग्लंडच्या कॅप्टनला समजलाच नाही.
स्टोक्सकडे कुठलही उत्तर नव्हतं
बेन स्टोक्सच्या रुपात अबरारने इंग्लंडची सहावी विकेट काढली. स्टोक्स आक्रमक फलंदाजीच्या मूडमध्ये होता. तो 30 धावांवर खेळत होता. 43 व्या ओव्हरमध्ये अबरार अहमदने असा चेंडू टाकला की, ज्याच स्टोक्सकडे कुठलही उत्तर नव्हतं. स्टोक्सने अबरारचा चेंडू अडवण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण तो अपयशी ठरला.
स्टोक्सही हा चेंडू पाहून दंग झाला
अबरारचा हा चेंडू खास होता. त्याने स्टोक्सला गुड लेंग्थ एरियामध्ये लेग स्टम्पच्या लाइनमध्ये चेंडू टाकला. स्टोक्स हा चेंडू रोखण्यासाठी फ्रंटफुटवर आला. पण चेंडूने पॅड्स आणि बॅटच्यामधून थेट स्टम्पसचा वेध घेतला. बेन स्टोक्सही हा चेंडू पाहून दंग झाला. त्याची Reaction च सर्व काही सांगू गेली.
अबरारसमोर ज्यो रुटही फेल
अबरार अहमदने बेन स्टोक्सच नाही, तर ज्यो रुट सारख्या क्वालिटी फलंदाजालाही चित केलं. अबरारने ज्यो रुटला आपल्या लेग स्पिनवर LBW आऊट केलं. चेंडू लेग स्टम्पवरुन वळून जो रुटच्या पॅडला लागला. त्यानंतर अंपायरने आऊटचा निकाल दिला.
This. Is. Special. ?#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/ExgHlMfrxY
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 9, 2022
अबरारचा रेकॉर्ड
अबरार अहमदने पहिल्या सेशनमध्येच पाच विकेट काढले. डेब्यु टेस्टमध्ये अशी कमाल करणारा तो पहिला पाकिस्तानी आणि आशियाई क्रिकेटर आहे. याआधी 1950 मध्ये अशी कामगिरी झाली होती. अबरार रावळपिंडी कसोटीतही पाकिस्तानी टीमचा भाग होता. पण बाबर आजमने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं नव्हतं.