Asia Cup 2023 Schedule | आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक अखेर जाहीर, टीम इंडिया-पाकिस्तान सामना केव्हा?

Asia Cup 2023 Schedule Announced | आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालंय. स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि श्रीलंकेत करण्यात आलंय.

Asia Cup 2023 Schedule | आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक अखेर जाहीर, टीम इंडिया-पाकिस्तान सामना केव्हा?
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 9:15 PM

मुंबई | क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित आशिया कप 2023 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर प्रसिद्ध करण्यात आलंय. आशियाई क्रिकेट काउन्सिल अर्थात एसीसीप्रमुख आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आशिया कप स्पर्धेच्या मुख्य तारखा याआधीच जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं नव्हतं. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक कधी येणार, असा सवाल क्रिकेट चाहत्यांना पडला होता. आता प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.

आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांमध्ये हायब्रिड पद्धतीने करण्यात आलंय. स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 17 सप्टेंबरला महाअंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अधिक उत्सूकता आहे.

आशिया कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला केव्हा?

टीम इंडिया आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा सामना हा या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. साखळी फेरीतील हा हायव्होल्टेज सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी इथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच टीम इंडिया आणि पाकिस्तानने सुपर 4 साठी क्वालिफाय केलं तर पुन्हा दोन्ही संघ 10 सप्टेंबरला आमनेसामने येतील.

एका ट्रॉफीसाठी 6 संघांमध्ये रस्सीखेच

आशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ क्रिकेट टीमचा समावेश आहे. नेपाळची आशिया कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

टीम इंडियाच्या साखळी फेरीतील वेळापत्रक

2 सप्टेंबर, टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान.

5 सप्टेंबर, टीम इंडिया विरुद्ध नेपाळ.

बाद फेरीतील सामने

ए 1 विरुद्ध बी 2, 6 सप्टेंबर.

बी 1 विरुद्ध बी 2, सप्टेंबर.

ए 1 विरुद्ध ए 2 – 10 सप्टेंबर.

ए2 विरुद्ध बी 1 – 12 सप्टेंबर.

ए 1 विरुद्ध बी 1, 14 सप्टेंबर.

ए 2 विरुद्ध बी 2 – 15 सप्टेंबर.

महाअंतिम सामना – 17 सप्टेंबर.

स्पर्धेबाबत महत्वाची माहिती थोडक्यात

आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या स्पर्धेतील एकूण 11 सामने हे 50 ओव्हर्सचे असणार आहेत. स्पर्धेत सहभागी असणाऱ्या एकूण 6 संघांना एकूण 2 गटांमध्ये विभागण्यात आलंय.त्याननुसार टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ हे 3 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. तर बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान टीम बी ग्रुपमध्ये आहेत.

दोन्ही संघातील प्रत्येक टीम ही एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. यामध्ये दोन्ही गटातून प्रत्येकी 2 संघ हे सुपर 4 साठी क्वालिफाय करतील. तर दोन्ही संघातून प्रत्येकी 1 अशा 2 संघाचं आव्हान संपुष्टात येईल. त्यानंतर सुपर 4 मध्ये प्रत्येक टीम उर्विरत 3 संघांविरुद्ध खेळेल. या सुपर 4 मधून अव्वल आणि दुसऱ्या स्थानी असलेले दोन्ही संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.