IPL 2023 : गोविंदाच्या जावयावर आयपीएलमध्ये शाहरुखच्या टीमला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी
IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्स टीममधील प्लेयर गोविंदाचा जावई आहे. त्याच्यावर यंदा अभिनेता शाहरुख खानच्या टीमला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी आहे. श्रेयस अय्यर दुखापीतमुळे संपूर्ण सीजनमध्ये खेळू शकणार नाहीय.
IPL 2023 KKR News : कोलकाता नाइट रायडर्सला काही दिवसांपूर्वी झटका बसला. त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल 2023 च्या संपूर्ण सीजनमध्ये खेळू शकणार नाहीय. त्यानंतर नव्या कर्णधाराचा शोध सुरु झाला. अय्यरच्या जागी कोणाची निवड होणार? याची सर्वांनाच उत्सुक्ता होती. अखेर शाहरुख खानच्या टीमला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी हिरो नंबर 1 गोविंदाच्या जावयावर सोपवण्यात आलीय.
केकेआरचा नवीन कॅप्टन नीतीश राणा नात्यामध्ये गोविंदाचा जावई लागतो. नीतीश राणा कपिल शर्माच्या शो मध्ये आला होता. त्यावेळी अभिनेता कृष्णा अभिषेकने नात्याबद्दलचा खुलासा केला होता.
माझे भाऊजी लागतात
नीतीश माझे भाऊजी लागतात, असं कृष्णाने सांगितलेलं. नीतीशची बायको सांची कृष्णाची नात्यातील बहिण आहे. कृष्णा गोविंदाचा भाचा आहे. त्या नात्याने सांची गोविंदाची भाची आणि नीतीश जावई होतो.
राणा केकेआरचा भाग
नीतीश राणा 2018 पासून केकेआरकडून खेळतोय. तो बराच काळ लीडरशिप ग्रुपचा भाग होता. आता पहिल्यांदा त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. कॅप्टनशिप एका टॅगशिवाय जास्त काही नाहीय, असं नीतीश राणा म्हणाला. नीतीश राणा बराचकाळ लीडरशिप ग्रुपचा भाग होता. नितीश राणा कॅप्टनशिपचा दबाव घेत नाहीय. कारण त्याचा परिणाम त्याच्या खेळावर होऊ शकतो. पहिल्यांदा एखादी गोष्ट करताना दबाव असतो, हे सुद्धा त्याने मान्य केलं. नीतीश राणाचा कॅप्टनशिप रेकॉर्ड काय सांगतो?
नीतीश राणा केकेआरमध्ये दिनेश कार्तिक, ऑयन मॉर्गन शिवाय मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळलाय. कोणाचीही कॅप्टनशिप आपण फॉलो करत नाही, असं नीतीश सांगतो. काही दिवसातच समजेल, मी कसा कॅप्टन आहे. राणाने दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 12 टी 20 सामन्यात नेतृत्व केलय. यात 8 विजय आणि 4 पराजय आहेत.