AFG vs SA: अफगाणिस्तानकडे क्लिन स्वीपची संधी, दक्षिण आफ्रिका लाज राखणार?
Afghanistan vs South Africa 3rd ODI: अफगाणिस्तान क्रिकेट टीम 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा आज रविवारी 22 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. टेम्बा बावुमा याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. भारतीय वेळेनुसार सामन्याला 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवता होणार आहे. हा सामना मोबाईलवर फॅन कोड एपवर पाहता येईल. दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना प्रतिष्ठेचा असा आहे. तर अफगाणिस्तान इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे.
अफगाणिस्तानने ही 3 सामन्यांची मालिका आधीच जिंकली आहे. अफगाणिस्तान या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे अफगाणिस्तानकडे तिसरा आणि अंतिम सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेला लाज राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विजयी हॅटट्रिक करत दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्वीप देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पहिल्या 2 सामन्यांमध्ये काय झालं?
दरम्यान अफगाणिस्तानने पहिले दोन्ही सामने हे मोठ्या फरकाने जिंकले आहेत. अफगाणिस्तानाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 6 विकेट्सने विजय मिळवला. अफगाणिस्तानने विजयासाठी मिळालेलं 107 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून 24 ओव्हरआधीच पूर्ण केलं. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी धुव्वा उडवला. अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 312 धावांचा पाठलाग करताना 34.2 ओव्हरमधअये 134 धावावंर गुंडाळलं होतं.
अफगाणिस्तान विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज
𝐓𝐡𝐢𝐫𝐝 𝐎𝐃𝐈 𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐇𝐨𝐫𝐢𝐳𝐨𝐧! 🏏
After taking an unassailable 2-0 lead in the series, #AfghanAtalan will meet South Africa in the 3rd and final match of the ongoing ODI series this afternoon in Sharjah. 🤩#AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/nytFuIgk62
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 22, 2024
अफगाणिस्तान क्रिकेट टीम : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), इकराम अलीखिल (विकेटकीपर), रहमानउल्ला गुरबाज, रियाझ हसन, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर, फझलहक फारुकी, गुलबदीन नायब, दरविश रसूली, नावीद अहमद, फरेद अहमद मलिक, अब्दुल मलिक आणि बिलाल सामी.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम: टेम्बा बावुमा (कर्णधार), काइल व्हेरेन (विकेटकीपर), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, विआन मुल्डर, ब्योर्न फोर्टुइन, नकाबा पीटर, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी, लिझाद विल्यम्स, जेसन स्मिथ, अँडिले फेहलुकवायो, ओटनील बार्टमन आणि अँडिले सिमेलेन.