IPL 2024 | भारताच्या शेजारी देशाची आपल्या तीन क्रिकेटपटूंवर कारवाई, हे 3 IPL मध्येही खेळणार नाही का?
IPL 2024 | भारताच्या शेजारी देशाने आपल्या तीन क्रिकेटपटूंवर बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे पुढच्या सीजनमध्ये ते आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी दिसतेय. हे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्याऐवजी व्यावसायिक क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देत होते.
IPL 2024 | भारताच्या शेजारी देशाने आपल्या 3 खेळाडूंवर कारवाई केली आहे. त्या तिघांच्या फ्रेंचायजी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. ज्या तिघांना फ्रेंचाजयी क्रिकेट खेळण्यापासून रोखलय, त्यांच्यावर 2 वर्षांसाठी बंदी घातली आहे. यात मुजीब उर्र रहमान, नवीन उल हक आणि फजल हक फारूखी हे क्रिकेटपटू आहेत. हे तिघेही अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आहेत. तिन्ही क्रिकेटपटूंच वर्तन पाहून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतलाय. हे तिघेही अफगाणिस्तानसाठी क्रिकेट खेळण्यापेक्षा स्वत:च्या व्यक्तीगत हिताला महत्त्व देत होते, म्हणून ही कारवाई करण्यात आलीय.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रेस रिलीज प्रसिद्ध करुन खेळाडूंच्या फ्रेंचायजी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातल्याच सांगितलं. हे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्याऐवजी व्यावसायिक क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देत होते, असं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
या खेळाडूंनी काय मागणी केलेली?
इतकच नाही, बोर्डाने या खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही रोखले आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी एक समितीच गठन केलं आहे. जानेवारी 2024 मध्ये या खेळाडूंनी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून रिलीज करण्याची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी आधी त्यांची उपलब्धता जाणून घ्यावी, असं या खेळाडूंनी म्हटलं होतं.
🚨 ANNOUNCEMENT 🚨
The ACB has decided to delay the annual central contracts and opt not to grant NOCs to three national players, @Mujeeb_R88, @fazalfarooqi10 and Naveen Ul Haq.
Full Details 👉: https://t.co/FKECO8U7Ba pic.twitter.com/GMDaTzzNNP
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 25, 2023
हे तिघे वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळलेले?
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मुजीब, नवीन आणि फजलला पुढची 2 वर्ष फ्रेंचायजी क्रिकेट खेळण्यासाठी NOC द्यायला नकार दिला. त्यामुळे हे तिघे या वर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे. मुजीब उर्र रहमानला कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल ऑक्शनमध्ये विकत घेतलय. नवीन उल हक आधीपासून लखनौ सुपर जायंट्सचा भाग आहे. फजलहक फारूखीला सनरायजर्स हैदराबादने रिटेन केलय. हे तिन्ही खेळाडू अफगाणिस्तानकडून वनडे वर्ल्ड कपमध्ये सुद्धा खेळले होते.