राशिद खानने क्रिकेटसाठी दिलंय ‘हे’ मोठं बलिदान, मुलाखतीत केला खुलासा

अफगानिस्तान संघाचा हुकुमी एक्का असणाऱ्या राशिद खानने आपल्या कारकिर्दीत केलेल्या एका महत्त्वाच्या बलिदानाबद्दल सांगितलं आहे.

राशिद खानने क्रिकेटसाठी दिलंय 'हे' मोठं बलिदान, मुलाखतीत केला खुलासा
राशिद खान
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 6:11 PM

मुंबई : अफगानिस्तान क्रिकेटला एक नवी ओळख निर्माण करुन देण्यात सिंहाचा वाटा असणारा खेळाडू म्हणजे राशिद खान (Rashid Khan). जगातील अव्वल फिरकीपटू असणाऱ्या राशिदने जगातील दिग्गज क्रिकेटर्समध्ये फार कमी वेळात आपलं नाव सामिल करुन घेतलं आहे. अफगानिस्तानचा हा ‘मिस्ट्री स्पिनर’ टी-20 जगतातील एक खतरनाक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पण ही जागा मिळवण्यासाठी राशिदने अहोरात्र मेहनत केली आहे.

राशिद पूर्ण वर्ष सराव आणि विविध देशांत सामन्यांसाठी व्यस्त असतो. कधी आयपीएल तर कधी सीपीएल स्पर्धांमध्ये व्यस्त असणारा राशिद मागील पाच वर्षांत केवळ 25 दिवसच घरातल्यांसोबत राहिला आहे. त्याने स्वत:च एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे. राशिदने Guardian.co.uk बरोबर बोलताना हा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “मी मागील 5 वर्षांत केवळ 25 दिवसंच स्वत:च्या घरी राहिलो आहे.  मला माझ्या यशाचा आनंद घरातल्यांसोबत साजरा करण्यासाठी देखील वेळ नाहीये. मला या गोष्टीचं दुख होतं पण माझ्या कारकिर्दीची सुरुवात असल्यानं मला संघर्ष करणं गरजेचं होत.”

घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने न खेळल्याचं दुख

राशिद अफगानिस्तान संघाचा हुकुमी एक्का आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही राशिदने आपलं नाण खणखणीत वाजवलं आहे. पण तरी त्याला एका गोष्टीचा खेद आहे. ते म्हणजे त्याला घरच्या मैदानात कधीच आतंरराष्ट्रीय सामना खेळता आलेला नाही. त्याचे अफगानिस्तानचे अनेक चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी जेथेही सामना खेळायला जातो. तिथे त्या देशाचे स्थानिक नागरिक  आपल्या संघाला सपोर्ट करायला येतात. मलाही अशाचप्रकारचा सपोर्ट माझ्या देशातील नागरिकांकडून मिळावा अशी माझी इच्छा आहे.”

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध विजयासह शिखरने गाठले रेकॉर्ड्सचे ‘शिखर’, एकाच सामन्यात अनेक विक्रम

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

(Afghanistan Spinner Rashid Khan Spend only 25 days in last 5 years With Family says in an Interview)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.