लंडन: अफगाणिस्तानच्या अंडर 19 टीममधील (Afghanistan Under 19 Team) काही सदस्य अजूनही मायदेशी परतलेले नाहीत. त्यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान संघातील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय (Asylum in britain) मागितला आहे. संघातील काही जण वेस्ट इंडिजवरुन (West indies) अफगाणिस्तानला जाण्याऐवजी लंडनला निघून गेले. अफगाणिस्तानमधील मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शरण मागणारे खेळाडू आणि अन्य सदस्यांची नावे अजून उघड झालेली नाहीत. अफगाणिस्तानची अंडर 19 टीम वर्ल्डकप खेळण्य़ासाठी वेस्ट इंडिजला गेली होती. या स्पर्धेत त्यांनी दमदार खेळ दाखवला. सेमीफायनलमध्ये इंग्लंडने त्यांना पराभूत केलं. अफगाणिस्तान सारख्या नवख्या आणि देशात अशांतता असलेल्या संघाने सेमीफायनलपर्यंत मजल मारणं, सोपी गोष्ट नाहीय. स्पर्धेत त्यांचा संघ चौथ्या स्थानावर राहिला. ICC च्या कुठल्याही स्पर्धेतील आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली.
मायदेशी परतण्यास नकार
अंडर 19 टीममधील काही खेळाडू वर्ल्डकपनंतर ब्रिटनला निघून गेल्याची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पृष्टी केली. अफगाणिस्तानची वृत्त संस्था पश्तोवोआने हे वृत्त दिलं आहे. त्यांनी अफगाणिस्तानात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. पश्तोवोआ वेबसाइटचे संपादक जफर हांद यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. अफगाणिस्तान अंडर 19 टीममधील एक खेळाडू आणि तीन अधिकाऱ्यांनी घरी परतण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या दोन सूत्रांनी मला ही माहिती दिली, असा दावा जफर हांद यांनी केला आहे.
वर्ल्डकप खेळून मायदेशी परतताना 48 तास इंग्लंडमध्ये थांबायचे होते. संघातील चौघे जण तिथेच थांबले व त्यांनी आश्रय मागितला आहे.
Two sources in #Afghanistan #cricket board confirm 2me a player & 3 officials of the AFG U19 team refused 2return home.
After a successful World Cup’s tour, on the way back they had a 48-hour stay in #England where they chose 2remain & seek a political asylum. #U19WorldCup2022— Jafar Haand (@jafarhaand) February 7, 2022
आश्रय मागण्याची पहिली वेळ नाही
अफगाणिस्तानच्या अंडर 19 संघातील सदस्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय मागितल्याची ही पहिली घटना नाहीय. काहीवर्षांपूर्वी अफगाणिस्तानच्याच पाच-सहा खेळाडूंनी कॅनडामध्ये आश्रय मागितला होता. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने पुन्हा जबरदस्तीने अफगाणिस्तानात सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर पहिल्यांचाद चौघांनी विदेशात आश्रय मागितला आहे. अजून याबद्दल ब्रिटन किंवा तालिबानने कुठलेही वक्तव्य केलेलं नाही.
afghanistan under 19 team player and support staff seek asylum in britain reports afghan media