Asia Cup 2022: अफगाणिस्तानकडून बांगलादेशला मोठा झटका, सुपर-4 मध्ये प्रवेश

Asia Cup 2022: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत अफगाणिस्तानच शानदार प्रदर्शन कायम आहे. मंगळवारी अफगाणिस्तानने आशिया कप मध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

Asia Cup 2022: अफगाणिस्तानकडून बांगलादेशला मोठा झटका, सुपर-4 मध्ये प्रवेश
Afg TeamImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 6:53 AM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत अफगाणिस्तानच शानदार प्रदर्शन कायम आहे. मंगळवारी अफगाणिस्तानने आशिया कप मध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने बांगलादेशच्या (afg vs ban) संघाला 7 विकेटने हरवलं. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये हा सामना खेळला गेला. बांगलादेशच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण राशिद खान (Rashid Khan) आणि मुजीब उर रहमानच्या फिरकी गोलंदाजीसमोर बांगलादेशचा निभाव लागला नाही. ते फार मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. बांगलादेशच्या संघाने 20 षटकात सात विकेट गमावून फक्त 127 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या टीमने 18.3 षटकात तीन विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. याआधी टुर्नामेंटच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने बलाढ्य श्रीलंकेला नमवलं होतं. ग्रुप बी मधून सुपर 4 मध्ये दाखल होणारा अफगाणिस्तान पहिला संघ ठरला आहे. 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अफगाणिस्तानसाठी सोपा ठरला नाही. त्यांना थोडाबहुत संघर्ष करावा लागला. नजीबुल्लाह जादरान आणि इब्राहिम जादरान यांच्या तुफानी इनिंगच्या बळावर अफगाणिस्ताने विजय मिळवला.

शाकिबने दिला झटका

टी 20 क्रिकेटमध्ये बांगलादेशचा कॅप्टन शाकिबच्या नावावर सर्वाधिक विकेट आहेत. त्याने पाचव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मुश्फिरकुर रहीमकरवी स्टम्पिंग केलं. त्यानंतर मोसादेक हुसैनने दुसरा सलामीवीर हजरतुल्लाह जाजईला तंबूत धाडलं. गुरबाजने 11 आणि जाजईने 23 धावा केल्या.

दोन जादरान भारी पडले

45 धावात दोन विकेट गेल्यानंतर अफगाणिस्तानच्या संघावर दबाव आला होता. कॅप्टन मोहम्मद नबी आठ धावांवर आऊट झाला. त्यानंतर हा दबाव आणखी वाढला. नजीबुल्लाह जादरान आणि इब्राहिम जादरान यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यांनी खोऱ्याने धावा केल्या. त्यांनी 69 धावांची भागीदारी करुन अफगाणिस्तानला विजयी लक्ष्यापर्यंच पोहोचवलं. इब्राहिमने 41 चेंडूत 42 आणि नजीबुल्लाहने 17 चेंडूत नाबाद 43 धावा चोपल्या. त्याने सहा षटकार आणि एक चौकार मारला. या दरम्यान त्यांचा स्ट्राइक रेट 252.94 होता.

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.