IND vs AUS : KL Rahul-हार्दिक पंड्याने मिळून संपवला 9 वर्षांचा वनवास, पहा VIDEO

IND vs AUS : असा कुठला वनवास होता, जो हार्दिक पंड्या आणि केएल राहुलने मिळून संपवला? त्यासाठी एकदा हा VIDEO पहावा लागेल. टीम इंडियाच्या बॉलर्सनी काल कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियन टीम बॅकफुटवर.

IND vs AUS : KL Rahul-हार्दिक पंड्याने मिळून संपवला 9 वर्षांचा वनवास, पहा VIDEO
Hardik pandyaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 8:11 AM

IND vs AUS 1st ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने अचूक दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी करुन ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावात गुंडाळला. दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतले. भारतीय गोलंदाज दमदार प्रदर्शन करत असताना, हार्दिक पंड्याने सुद्धा वनडे क्रिकेटमध्ये विकेट्सचा दुष्काळ संपवला. हार्दिक पंड्याने फक्त 1 विकेट घेतला. पण त्याने सोबत 9 वर्षांचा दुष्काळ संपवला.

हार्दिक पंड्याने एक विकेट काढला, तरी तो खूप खास आहे. कारण 9 वर्षानंतर कुठल्या भारतीय कर्णधाराने वनडे क्रिकेटमध्ये विकेट घेतला. याआधी सुरेश रैनाने 2014 मध्ये ही कामगिरी केली होती.

ते गोलंदाजी करत नव्हते

आधी धोनी, विराट कोहली आणि आता रोहित शर्मा टीमच नेतृत्व करतोय, पण ते गोलंदाजी करत नाहीत. पंड्याला रोहितच्या जागी एका वनडे सामन्यात नेतृत्वाची संधी मिळाली. त्यावेळी त्याने हा दुष्काळ संपवला.

पंड्याने घेतलेला विकेट खूपच महत्वपूर्ण

हार्दिक पंड्याने 13 व्या ओव्हरमध्ये स्टीव्ह स्मिथला आऊट केलं. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर स्मिथने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू केएल राहुलच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. राहुलने सुद्धा ही जबरदस्त कॅच घेतली. स्मिथचा हा विकेट महत्वपूर्ण होता. कारण स्मिथ आणि मार्शने मिळून 72 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियन इनिंगमधील ही मोठी पार्टनरशिप आहे.

पंड्याची छोटी पण महत्वपूर्ण खेळी

फक्त चेंडूच नाही हार्दिकने बॅटने सुद्धा महत्वाच योगदान दिलं. त्याने फलंदाजीसाठी अवघड असलेल्या विकेटवर 31 चेंडूत 25 धावा केल्या. पंड्याने आपल्या इनिंगमध्ये 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. अशी कोसळली ऑस्ट्रेलियाची मधली फळी

स्टीव स्मिथ बाद झाल्यानंतर मिचेल मार्श 65 चेंडूत 81 रन्स करुन आऊट झाला. तो बाद होताच ऑस्ट्रेलियाची मधली फळी कोसळली. लाबुशेन, 26, ग्रीन 12, मॅक्सवेल 8, स्टॉयनिस 5 रन्स करुन आऊट झाले. शॉन एबॉट खातही उघडू शकला नाही. सिराज आणि शमीने मिळून ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावात संपवला. ऑस्ट्रेलियाचा डाव 35.4 ओव्हर्समध्ये संपला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.