अजिंक्य रहाणेला टि्वटरवर अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केलं जातय. एका युझरने हा फोटो टि्वट करुन 'थँक्यू रहाणे' म्हटलं आहे.
चेतेश्वर पुजारा (43) तर अजिंक्य रहाणे (9) धावांवर बाद झाला. त्यानंतर एका युझरने टि्वट केलेला हा गंमतीशीर फोटो
अमुल्य योगदानाबद्दल अजिंक्य रहाणे तुझे आभार, भारतीय कसोटी संघ नेहमीच तुला मिस करेल. असं एका टि्वटर युझरने म्हटलं आहे.
अजिंक्य रहाणेला संघात संधी का मिळाली? ते मी शोधतोय.
केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला आहे. संघाला गरज असताना अजिंक्य रहाणे अवघ्या 9 धावांवर आऊट झाला. राबाडाने वेरेनेकरवी त्याला झेलबाद केले.
मागच्या जोहान्सबर्ग टेस्टच्या पहिल्या डावात रहाणे शून्यावर बाद झाला होता. तेव्हाच त्याच्या कसोटी करीयरबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होते.
मागच्या दुसऱ्या कसोटीत हनुमा विहारीने दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली होती. पण तरीही अनुभवाला प्राधान्य देत हेड कोच राहुल द्रविड, विराट कोहली यांनी अजिंक्यला पाठिंबा दिला व तिसऱ्या कसोटीत संधी दिली.
अजिंक्य रहाणेच्या अलीकडच्या काही वर्षातील कसोटी संघातील कामगिरीवर अशा प्रकारच नेमकं भाष्य करण्यात आलं आहे.
अजिंक्य रहाणेचं कसोटी क्रिकेटमधील वॅगन व्हील.
अजिंक्य रहाणेला संघात स्थान देऊ नका. त्याऐवजी हनुमा विहारीला संधी द्या, असं गौतम गंभीरचं स्पष्ट मत होतं.