IND vs ENG : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंड संघात दिग्गज क्रिकेटपटू दाखल, मात्र सामन्यापूर्वीच खराब प्रदर्शन

मागील 10 सामन्यांत 5 वेळा एकेरी अंकावर बाद झालेला हा खेळाडू दोन सामन्यात तर शून्यावरही बाद झाला आहे. अशा प्रदर्शनानंतरही त्याला त्याला भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने संघात घेतले आहे.

IND vs ENG : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंड संघात दिग्गज क्रिकेटपटू दाखल, मात्र सामन्यापूर्वीच खराब प्रदर्शन
इंग्लंड कसोटी क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 12:41 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. ज्यामध्ये नॉटिंघम येथील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानातील सामन्यात इंग्लंडचा संघ 151 धावांनी पराभूत झाला. ज्यामुळे कसोटी मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे 25 ऑगस्टपासून लीड्स येथे सुरु होणाऱ्या सामन्यात विजयासाठी इंग्लंड खास रणनीती आखत आहे. यासाठी इंग्लंड संघाने एक धाकड खेळाडू संघात समाविष्ट केला आहे. या खेळाडूचं नाव आहे डेविड मलान (David Malan). पण इंग्लंडने विजयासाठी संघात घेतलेला डेविड सध्या पराभवाच्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे.

याचे कारण इंग्लंडमध्ये सध्या सुरु असलेल्या 100 चेंडूची क्रिकेट स्पर्धा असणाऱ्या द हण्ड्रेड (The hundred) स्पर्धेत डेविड खराब फॉर्ममध्ये दिसून येत आहे. डेविड स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्स संघात असून बाद फेरीच्या सामन्यात साउदर्न ब्रेवने डेविडच्या संघाला पराभूत केलं आहे. यावेळी सर्वात विश्वासू फलंदाज असतानाही डेविडने संघाला निराश केलं.

महत्त्वाच्या सामन्यात कमी धावांमध्ये बाद

डेविड मलानने बाद फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात ट्रेंट रॉकेट्स संघाच्या डावाची सुरुवात केली. डेविड केवळ 14 धावा करुन तंबूत परतला ‘करो या मरो’चा सामना असल्याने डेविडकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण डेविडच्या खराब कामगिरीमुळे ट्रेंट रॉकेट्स केवळ 96 धावाच करु शकला. त्यानंतर साउदर्न ब्रेव 97 धावांचे लक्ष्य केवळ 3 विकेटंच्य बदल्यात 68 चेंडूत पार करत 32 चेंडू आणि 7 विकेट्सने जिंकला.

मागील 10 सामन्यात डेविड मलान

द हण्ड्रेड लीग या स्पर्धेत मागील 10 सामन्यात डेविडने केवळ तीन 3 अर्धशतकं केली असून 5 वेळा तो एकेरी अंकावर बाद झाला आहे. तर दोन सामन्यात तो खातेही खोलू शकलेला नाही. अशा प्रदर्शनानंतरही भारताला विजयापासून रोखण्यासाठी इंग्लंडने डेविडची मदत घेतली आहे. त्यामुळे नेमकं डेविड कशी कामगिरी करेल हे पाहावं लागेल.

डेव्हिड मलान, ऑली पॉप, महमूदला संघात स्थान

डेव्हिड मलान तसेच ऑली पॉप यांच्यासह गोलंदाज महमूद यालासुद्धा इंग्लंडने संघात स्थान दिलेलं आहे. महमूदने आतापर्यंत कसोटी सामने खेळलेले नाहीत. त्याबरोबरच साकिब हेडिंग्ले याचीसुद्धा संघात वर्णी लागू शकते. डाव्या हाताचा फिरकीपटू जॅक लीचला टीममधून रिलीज करण्यात आले आहे. मात्र, लीच मोईन अलीच्या जागेवर स्टँडबाय म्हणून संघात राहील. गोलंदाज मार्क वूडच्या खांद्याला मार लागल्यामुळे तो जखमी आहे. असे असले तरी त्याला संघात कायम ठेवण्यात आलंय. भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 25 ऑगस्टला तिसरा कसोटी सामना होईल.

हे ही वाचा

राहुल द्रविडचा भारतीय संघात ‘या’ पदासाठी अर्ज, द्रविडच्या निर्णयाचे पाकिस्तानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत स्वागत

इंग्लंडच्या मैदानात ‘या’ गोलंदाजाची अफलातून कमाल, सात हॅट्रीक घेत रचला इतिहास

PHOTO : ‘सिराज तू तर जगात भारी’, पाकिस्तानची पत्रकार झाली मोहम्मद सिराजची फॅन

(After bad Impression in The hundred david malan is in england team for 3rd test against India)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.