Sourav ganguly: सौरव गांगुलीनंतर आता त्याची मुलगी सनाही कोरोना पॉझिटिव्ह
गांगुली कुटुंबातील सर्व पॉझिटिव्ह सदस्यांना घरातच आयसोलेट करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री सनाची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
कोलकाता : भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याकडे तिसरी लाट म्हणून पाहिले जात आहे. अनेक नेते आणि सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीला कोरोनाची लागण झाली होती. सौरव नंतर आता त्याची मुलगी सना गांगुलीला (Sana Ganguly) कोरोनाची लागण झाली आहे. गांगुलीचा भाऊ स्नेहाशीष आणि त्याची पत्नी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहेत. (After bcci president sourav ganguly his daughter sana ganguly tests positive for covid-19)
घरातच केलं आयसोलेट गांगुली कुटुंबातील सर्व पॉझिटिव्ह सदस्यांना घरातच आयसोलेट करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री सनाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सनाला सौम्य ताप आणि सर्दी झाली होती. म्हणून तिने कोरोना चाचणी केली. तिला गंभीर लक्षण नाहीयत. त्यामुळे सनाला घरातच आयसोलेट करण्यात आले आहे.
सौरव गांगुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीलाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर तो घरी परतला. गांगुलीला डेल्ट वेरिएंटची लागण झाली होती. त्यावेळी सना गांगुली आणि पत्नी डोनाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दोघांचा रिपोर्ट निगेटिव आला होता. आता गांगुलीचा रिपोर्ट निगेटिव आलाय. पण त्याची मुलगी पॉझिटिव्ह आहे. तिला कोरोनाच्या कुठल्या वेरिएंटची लागण झालीय, ते अजून स्पष्ट झालेले नाही.
संबंधित बातम्या:
New Home Isolation Guidelines : Omicronच्या पार्श्वभूमीवर होम आयसोलेशनसाठी नवी नियमावली, काय म्हटलं आरोग्य मंत्रालयानं? Coronavirus: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव, आई-पत्नीसह चौघांना लागण Bulli bai Case | आतापर्यंत तिघे ताब्यात, कसा लागला सुगावा? पोलिस आयुक्तांनी सांगितली मोड्स ऑपरेंडी