ना ‘नो बॉल’, ना ‘डेड बॉल’, फलंदाज क्लीन बोल्ड होऊनही Not out, कसं काय? पाहा VIDEO

चेंडूने विकेटकिपरच्या ग्लोव्हजमध्ये जाण्याआधी यष्ट्यांचा वेध घेत बेल्स उडवल्या. पण तरीही जॉर्जियाला पंचांनी बाद दिलं नाही. खरंतर तो चेंडू नो बॉल किंवा डेड बॉल असेल, तर फलंदाज नाबाद राहतो. पण इथे...

ना 'नो बॉल', ना 'डेड बॉल', फलंदाज क्लीन बोल्ड होऊनही Not out, कसं काय? पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 12:43 PM

मेलबर्न: क्रिकेट (Cricket) हा अनिश्चिततेचा खेळ आहेचं. पण क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा चक्रावून टाकणाऱ्या घडामोडी घडतात. फक्त आंतरराष्ट्रीयच नाही, तर विविध देशांमधील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये मैदानात अजब-गजब गोष्टी घडतात. मैदानावरचं ते दृश्य पाहिल्यानंतर हे असं-कसं घडू शकतं? एवढाच प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. एखादा फलंदाज एलबीडब्ल्यू किंवा बॅट अँड पॅड झेलने आऊट असेल, तर त्याला संशयाचा फायदा देऊन पंचांकडून नाबाद ठरवलं जातं. पण फलंदाज पंचांच्या समक्ष क्लीन बोल्ड असूनही त्याला नाबाद ठरवलं गेलं. ऑस्ट्रेलियात महिलांच्या नॅशनल क्रिकेट लीग स्पर्धेत असाच चक्रावून सोडणारा प्रकार घडला.

होबार्टच्या मैदानात क्वींसलँड आणि टास्मानियामध्ये सामना सुरु होता. क्वींसलँडचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. डावातील 14 वे षटक सुरु होते. टास्मानियाची गोलंदाज वाकारेवा हे षटक टाकत होती. या षटकातील पहिल्या चेंडूवर कुठलीही धाव दिली नाही. दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव घेतली. जॉर्जिया वॉल नॉन-स्ट्राइकवरुन स्ट्राइक एंडवर गेली. तिसऱ्या चेंडूवर कोणतीही धाव आली नाही. वाकारेवाने टाकलेल्या चौथ्या चेंडूने जॉर्जिया वॉलला चकवलं.

चेंडूने विकेटकिपरच्या ग्लोव्हजमध्ये जाण्याआधी यष्ट्यांचा वेध घेत बेल्स उडवल्या. पण तरीही जॉर्जियाला पंचांनी बाद दिलं नाही. खरंतर तो चेंडू नो बॉल किंवा डेड बॉल असेल, तर फलंदाज नाबाद राहतो. पण इथे गोलंदाजाची कोणतीही चूक नव्हती. जॉर्जियाने बाद झाल्यानंतरही पुढे खेळ सुरु ठेवला.

अपील नाही, तर विकेट नाही क्रिकेटच्या नियमानुसार जॉर्जिया वॉल आऊट होती. पण टास्मानियाच्या संघाने कोणतेही अपील केले नाही. ही बाब त्यावेळी कोणाच्याही लक्षात आली नाही. त्यामुळे खेळ पुढे सुरु राहिला. चेंडूने बेल्स उडवल्या, त्यावेळी जॉर्जिया 39 चेंडूत 26 धावांवर खेळत होती. या प्रकारातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मैदानावर अपील करणं खूप आवश्यक असतं.

संबंधित बातम्या:

स्टीव्ह स्मिथचे बेडरुममधील चाळे पत्नीने केले उघड, मध्यरात्री एकच्या सुमारास…. AUS vs ENG: अखेर अ‍ॅशेस सीरीजमध्ये कोरोनाची एंट्री, कसोटी मालिका धोक्यात? VIDEO | लेकाच्या लग्नात प्रफुल्ल पटेलांची धमाल, ‘जुम्मे की रात’वर सलमान-शिल्पा शेट्टीसोबत डान्स

ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.