IPL 2023 : भर रस्त्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला भिडला CSK चा ब्राव्हो, म्हणाला ‘माझं नाव नीट घे’ VIDEO

IPL 2023 : नेमकं काय झालं दोघांमध्ये? आणि कुठे घडलं?. दोन्ही जिगरी यार भिडले. चेन्नई आणि मुंबईमध्ये सर्वात जास्त यशस्वी टीम कुठली, यावरुन दोघे भिडले. तेही भर रस्त्यात.

IPL 2023 : भर रस्त्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला भिडला CSK चा ब्राव्हो, म्हणाला 'माझं नाव नीट घे' VIDEO
CSK IPL 2023 Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 11:46 AM

नवी दिल्ली : ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्सचा प्राण आहे. तो या टीममधून खेळत असताना, CSK ने तीनवेळा आयपीएलच विजेतेपद मिळवलं. आता तो कोच बनून CSK च्या टीममध्ये योगदान देतोय. चेन्नई सुपर किंग्सने नुकतच गुजरात टायटन्सला हरवून पाचव्यांदा आयपीएलच विजेतेपद मिळवलं. चेन्नई आयपीएलमधील एक यशस्वी टीम आहे. नुकतच ड्वेन ब्राव्हो मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूला भिडला.

मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो दोघे जिगरी दोस्त आहेत. आता पोलार्ड सुद्धा खेळाडूच्या भूमिकेतून कोचच्या रोलमध्ये गेला आहे.

दोघे भिडले कशावरुन?

ब्राव्हो आणि पोलार्ड टी 20 मधले बेस्ट क्रिकेटर्स आहेत. आपआपल्या टीमला विजेतेपद मिळवून देण्यात दोघांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. पोलार्ड मुंबई इंडियन्स आणि ब्राव्हो चेन्नईचा प्राण आहे. दोघे चांगले मित्र आहेत. पण चेन्नईने किताब जिंकल्यानंतर हे दोन्ही जिगरी यार भिडले. चेन्नई आणि मुंबईमध्ये सर्वात जास्त यशस्वी टीम कुठली, यावरुन दोघे भिडले.

हा वाद मिटवण्यात कोणी मदत करेल?

चेन्नईच्या विजयानंतर गोलंदाजी कोच ब्राव्हो आणि पोलार्ड परस्परांना भेटले. त्यावेळी भररस्त्यात कारमध्ये दोघे भिडले. ब्राव्होने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात त्याने विचारलय की, हा वाद मिटवण्यात कोणी मदत करेल?

बोलती बंद

मुंबई इंडियन्स आयपीएलमधली सर्वात यशस्वी टीम आहे. असं पोलार्डच मत आहे. रेकॉर्डनुसार, आता चेन्नई यशस्वी संघ आहे. पोलार्डला ट्रॉफीबद्दल बोलयचय. माझ नाव आदराने घे, असं ब्राव्होने सांगताच, पोलार्डची बोलती बंद झाली. ते इथे-तिथे पहायला लागला. चेन्नई आणि मुंबई दोन्ही टीम्सनी आतापर्यंत 5-5 किताब जिंकलेत. चेन्नईने 5 वा किताब जिंकताच ब्राव्होने पोलार्डची फिरकी घेतली. जिगरी मित्राने फायनल पाहिली असावी, असं ब्राव्हो म्हणाला.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.