Mohit Sharma IPL 2023 : परफॉर्मन्सच दमदार, मोहित शर्माला टीम इंडियात पुन्हा संधी मिळेल? VIDEO
Mohit Sharma IPL 2023 : मोहित शर्मा टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी दावेदार आहे. कारण त्याची कामगिरीच तशी आहे. IPL 2023 च्या सीजनमधील त्याच्या परफॉर्मन्सवर एक नजर मारा.
अहमदाबाद : IPL 2023 च्या सीजनमध्ये शर्यती बाहेर गेलेल्या अनेक खेळाडूंनी दमदार पुनरागमन केलं. आपली छाप उमटवली. आज त्या खेळाडूंच कौतुक होतय. यामध्ये सर्वात मोठं नाव आहे मोहित शर्मा. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मा खेळला. फायनलमध्ये मोहित शर्माने जबरदस्त गोलंदाजी केली. जवळपास त्याने आपल्या टीमचा विजय पक्का केला होता. या सीजनमध्ये मोहितने अनेक प्रसंगात आपल्या टीमला अडचणीतून बाहेर काढलं. त्यामुळे आता प्रश्न विचारला जातोय की, या खेळाडूला टीम इंडियात पुन्हा स्थान मिळणार?
आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये मोहित शर्मा लास्ट ओव्हर टाकली. त्याच्या शेवटच्या 2 चेंडूंवर रवींद्र जाडेजाने 10 धावा करुन चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवून दिला. पण त्याआधी त्याने चार चेंडू असे टाकले की, त्यावरुन त्याच्या शानदार फॉर्मची कल्पना येते.
मागच्या सीजनमध्येही मोहित गुजरातच्या टीममध्ये होता, पण….
मोहित शर्मा 2015 साली वनडे वर्ल्ड कप टीममध्ये होता. या वर्ल्ड कपमध्ये मोहित शर्मा सेमीफायनलच्या मॅचपर्यंत खेळला होता. त्यानंतर मोहित शर्मा हे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमधून गायब झालं. मागच्या सीजनमध्ये तो गुजरात टायटन्सच्या टीमचा नेट गोलंदाज होता. या सीजनमध्ये त्याला संधी मिळाली. मोहित शर्माने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. त्याने शानदार खेळ दाखवला. मोहितने क्वालिफायर-2 मध्ये 5 विकेट काढून मुंबई इंडियन्सला विजयापासून रोखलं होतं.
?? ??? ????!
Two shots of excellence and composure!
Finishing in style, the Ravindra Jadeja way ?#TATAIPL | #Final | #CSKvGT pic.twitter.com/EbJPBGGGFu
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
मोहितने आयपीएलमध्ये पर्पल कॅप कधी मिळवलेली?
मोहितने या सीजनमध्ये 14 मॅच खेळून 27 विकेट काढल्या. या सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याची कामगिरी पाहून त्याला पुन्हा टीम इंडियात स्थान मिळणार का? हा प्रश्न विचारला जातोय. मोहितने आपल्या आयपीएल करीयरची सुरुवात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समधून केली होती. 2016 च्या सीजनपर्यंत तो CSK चा भाग होता. 2014 मध्ये CSK कडून खेळताना त्याने पर्पल कॅप मिळवली होती. हार्दिकने त्याला मिठी मारली
मोहित शर्माचा वनडे क्रिकेटसाठी विचार होण्याची शक्यता कमी आहे. पण आगामी T20 सीरीजमध्ये संधी मिळण्यासाठी तो नक्कीच दावेदार आहे. हार्दिक पांड्या टीम इंडियाचा T20 कॅप्टन आहे. त्याशिवाय गुजरात टायटन्सची कॅप्टनशिप सुद्धा त्याच्याकडे आहे. फायनलनंतर हार्दिकने मोहितला मिठी मारली. याचा अर्थ इतकाच निघतो की, निकाल काहीही लागो, हार्दिक मोहितच्या कामगिरीवर खूश आहे.