Rinku Singh Exclusive : KKR चा मॅचविनर रिंकू सिंहने आईला दिलं खास गिफ्ट, वडिलांना म्हणाला….
KKR Rinku Singh IPL 2023 Exclusive : बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातून येऊन, आज या मुलाने हे यश मिळवलय. रिंकूने आईसाठी जे केलं, ते कौतुकास्पद आहे. त्याच्या क्रिकेट खेळण्याबद्दल आई-वडिलांच काय मत होतं?
KKR Rinku Singh News : रिंकू सिंह…या नावाची क्रिकेट विश्वात एकच चर्चा आहे. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध रिंकूने आक्रमक बॅटिंग करुन टीमला विजय मिळवून दिला. रिंकूने लास्ट ओव्हरमध्ये 5 सिक्स मारुन गुजरात टायटन्सकडून विजयाचा घास हिरावला. रिंकू सिंहने या कमालीच्या इनिंगनंतर TV9 भारतवर्ष सोबत खास चर्चा केली.
एकदिवस मी टीम इंडियाकडून खेळेन, असं रिंकू सिंहने टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना सांगितलं. आपल्या मुलाने टीम इंडियाकडून खेळावं, अशी खानचंद्र सिंह यांनी इच्छा व्यक्त केली.
रिंकू नोकरीसाठी सुद्धा गेला होता, पण….
रिंकू सिंहला त्याचे वडिल क्रिकेट खेळण्यापासून मनाई करायचे. “वडिल घरात एकटे कमावते होते. मी सुद्धा काम करावं, अशी त्यांची इच्छा होती. जेणेकरुन घरी थोडे पैसे येतील. पण माझं मन क्रिकेटमध्ये होतं. मी एका ठिकाणी नोकरीसाठी सुद्धा गेलो होतो. पण मला ती नोकरी आवडली नाही. मी क्रिकेट खेळून सुद्धा पैसे कमावू शकतो, हे घरी सांगितलं” असं रिंकू म्हणाला.
रिंकू सिंहने आईला दिलं खास गिफ्ट
रिंकूने आपल्या कमाईमधून आईसाठी बांगड्या विकत घेतल्या. त्याशिवाय तो आपल्या आईसाठी साडी सुद्धा विकत घेतो. रिंकूला नेहमीच त्याच्या आईचा सपोर्ट मिळालाय. मुलाने काम करुन चार पैसे कमवावेत, अशी त्याच्या आईची सुद्धा इच्छा होती. तिला आपल्या मुलावर विश्वास होता. म्हणून आईने रिंकूला क्रिकेट खेळण्याची मोकळीक दिली. रिंकू सिंह आज क्रिकेटमधला नवीन सुपरस्टार बनलाय. रिंकूने या सीजनमध्ये कोलकाताला दोन मॅच जिंकवून दिल्यात. रिंकू सिंहने आपल्या प्रतिभेनुसार, खेळू दाखवून टीम इंडियाकडून खेळावं, अशी इच्छा आहे.