Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Final: गुजरातच्या विजयाने नताशा इमोशनल, हार्दिकच्या मिठीत नताशाच्या डोळ्यात पाणी आलं, VIDEO

IPL 2022 Final: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने (Gujarat Titans Champion) पहिल्याच सीजनमध्ये कमाल केली आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यापासून जबरदस्त खेळणाऱ्या या संघाने फायनलमध्येही तशीच कामगिरी केली.

IPL 2022 Final: गुजरातच्या विजयाने नताशा इमोशनल, हार्दिकच्या मिठीत नताशाच्या डोळ्यात पाणी आलं, VIDEO
Hardik Pandya-Natasa Stankovic Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 7:13 AM

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगला (IPL 2022) 15 व्या सीजनमध्ये एक नवीन चॅम्पियन मिळाला आहे. काल गुजरातमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलची फायनल मॅच झाली. या सामन्यात नवख्या गुजरात टायटन्स संघाने अनुभवी राजस्थान रॉयल्सवर (GT vs RR) सात विकेटने विजय मिळवला व जेतेपदाला गवसणी घातली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने (Gujarat Titans Champion) पहिल्याच सीजनमध्ये कमाल केली आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यापासून जबरदस्त खेळणाऱ्या या संघाने फायनलमध्येही तशीच कामगिरी केली. त्यांनी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला फक्त 130 धावांमध्ये रोखलं. T 20 क्रिकेटच्या दृष्टीने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी फार अवघड लक्ष्य नव्हतं. त्यांनी दोन ओव्हर्स आणि सात विकेट राखून आरामात विजय मिळवला.

हार्दिकची महत्त्वाची कामगिरी

कॅप्टन हार्दिक पंड्या गुजरातच्या या विजयाचा हिरो ठरला. हार्दिक पंड्याने चार षटकात फक्त 16 धावा दिल्या व जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमयार या महत्त्वाच्या विकेट काढल्या. त्यानंतर गुजरातच्या दोन विकेट लवकर गेल्या होत्या. त्यावेळी हार्दिक फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने शुभमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वाची ठरणारी 63 धावांची भागीदारी केली.

नताशाने हार्दिकला मारली मिठी

पहिल्याच हंगामात हार्दिकच्या संघाने थेट चॅम्पियनशिपला गवसणी घातली. त्यामुळे गुजरातच्या चाहत्यांना आनंद झालाच. पण हार्दिक पंड्याची बायको नताश स्टँकोविक या विजयानंतर खूप भावनिक झाली होती. सामना संपल्यानंतर ती मैदानात आली. त्यावेळी तिने नवरा हार्दिक पंड्याला मिठी मारली. हार्दिकने सुद्धा तिला प्रेमाने अलिंगन दिले. गुजरातच्या विजयामुळे नताशाल इतका आनंद झाला होता की, तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. हार्दिक आणि नताशाचं हे भावनिक नातं कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटलं नाही.

नताशाने प्रत्येक मॅच मध्ये चिअर केलं

नताश स्टँकोविक गुजरात टायटन्सच्या प्रत्येक सामन्याच्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असायची. गुजरातच्या संघासाठी ती प्रेक्षक स्टँडमधून चिअर करायची. संघाचा उत्साह वाढवायची. स्टेडियममधल्या तिच्या अदा, उत्साह कॅमेऱ्याने प्रत्येकवेळी टिपला. सोशल मीडियावर त्याची भरपूर चर्चाही झाली. काल गुजरातने विजेतेपद मिळवल्यानंतर तिला झालेला आनंद स्वाभाविक आहे.

परफॉर्मन्समधून सर्व प्रश्नांची उत्तर

हार्दिक पंड्याने IPL 2022 मधून जोरदार कमबॅक केलं आहे. सीजन सुरु होण्याआधी गुजरात टायटन्सकडून कोणीही अशा कामगिरीची अपेक्षा केली नव्हती तसंच कॅप्टन हार्दिक पंड्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आता त्याने आपल्या कामिगिरीतूनच सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.