Team India : टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटर्सनी सुपरस्टार रजनीकांत यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट

IND vs AUS 1st ODI : स्टे़डियममधला कॅमेरा रजनीकांत यांच्यावर जाताच वानखेडेमधील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. यातून रजनीकांत यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये असलेली क्रेझ दिसून आली.

Team India : टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटर्सनी सुपरस्टार रजनीकांत यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट
Rajnikanth -team indiaImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 1:31 PM

IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाच्या क्रिकेटपटुंनी आज सुपरस्टार रजनीकांत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. रजनीकांत काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडे सामन्याला उपस्थित होते. त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यांचा आनंद लुटला. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अमोल काळे हे रजनीकांत यांच्या शेजारी बसून त्यांच्याशी वार्तालाप करत असल्याचे फोटो मुंबई क्रिकेट असोशिएशनने त्यांच्या टि्वटर अकाऊंटवर शेअर केलेत.

स्टे़डियममधला कॅमेरा रजनीकांत यांच्यावर जाताच वानखेडेमधील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. यातून रजनीकांत यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये असलेली क्रेझ दिसून आली. रजनीकांत यांनी काल व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट परिधान केली होती. वानखेडेवरच्या व्हीआयपी हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये बसून त्यांनी पहिल्या वनडेचा आनंद घेतला.

मुंबईत मॅचला सेलिब्रिटींची कमतरता नसते

टीम इंडियाच्या मुंबईत मॅच असतात, तेव्हा सेलिब्रिटींची कमतरता नसते. अभिनेता आमिर कान, रितेश देशमुख आणि सोहेल खान मेन इन ब्ल्यूसाठी चिअर करताना दिसतात. यावेळी सुपरस्टार रजनीकांत हार्दिक पंड्या अँड कंपनीचा उत्साह वाढवण्यासाठी आले होते. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी रजनीकांत यांना पहिल्या वनडेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं होतं.

टीम इंडियाच्या कुठल्या क्रिकेटर्सनी रजनीकांत यांची भेट घेतली?

“रजनीकांत सतत व्यस्त असतात. त्यांनी माझं निमंत्रण स्वीकारल्यामुळे मी आनंदी आहे. ते संपूर्ण दिवस इथे थांबले ही मोठी बाब आहे” असं अमोल काळे टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले. रजनीकांत यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांची पत्नी लता सोबत होती. आज कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि टीम इंडियाच्या अन्य क्रिकेटपटुंनी रजनीकांत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.