India vs Pakistan: शमीवर टीकांच्या वर्षावानंतर अवघं क्रिकेट जगत एकवटलं, शमीच्या समर्थनार्थ अनेकांचे ट्विट
टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव झाला. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला आहे, अशा परिस्थितीत चाहत्यांचा राग सोशल मीडियावर उफाळून येत होता.
मुंबई : टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव झाला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला. अशा परिस्थितीत चाहत्यांचा राग सोशल मीडियावर अजूनपर्यंत उफाळून येत आहे. दरम्यान पाकिस्तानच्या हातून झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला टीकांचा धनी व्हावं लागलं. त्याच्या ओव्हरला काही अधिक धावा गेल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. पण आता अनेक क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या बचावासाठी पुढे आले आहेत. विशेष म्हणजे शमीचं नाव ट्विटर ट्रेन्डमध्येही बऱ्याच काळापासून आहे. यावरुन सोशल मीडियावर त्याची किती चर्चा आहे हे दिसून येत आहे.
पाकिस्तानविरुद्ध मोहम्मद शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 6 चौकार, एक षटकार ठोकला. या खराब कामगिरीनंतर लोकांनी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले आणि त्याच्यावर उलट-सुलट आरोप केले आहेत. मोहम्मद शमीच्या विरोधात ट्विटरवर अनेक गोष्टी लिहिल्या जात होत्या. त्यानंतर सर्वात आधी सेहवागने ट्विट करत शमीला पाठिंबा दर्शवला, ज्यानंतर अनेकांनी ट्विट केलं. आकाश चोप्राने तर थेट त्याचा ट्विटरचा फोटो बदलून शमीचा फोटो ठेवला.
#NewProfilePic pic.twitter.com/5l1eiS0zjd
— Aakash Chopra (@cricketaakash) October 26, 2021
पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकारही शमीच्या बाजूने
या सर्वामध्ये पाकिस्तानला विजय मिळवण्याच मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या रिजवाननेही ट्विट करत शमीला पाठिंबा दिला आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,’अत्यंत तणावाखाली एक खेळाडू आपल्या देशासाठी खेळत असतो. मोहम्मद शमीतर एक जगातील उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या देशवासियांनी आपल्या खेळाडूंना पाठिंबा द्यायला हवा. हा खेळ सर्वांना एकत्र करण्यासाठी आहे विभागण्यासाठी नाही.’
The kind of pressure, struggles & sacrifices a player has to go through for his country & his people is immeasurable. @MdShami11 is a star & indeed of the best bowlers in the world
Please respect your stars. This game should bring people together & not divide ’em #Shami #PAKvIND pic.twitter.com/3p70Ia8zxf
— Mohammad Rizwan (@iMRizwanPak) October 26, 2021
विरेंद्र सेहवागनेही सुनावलं
शमीवरील टीकेनंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने अशा लोकांना खडसावले आहे. वीरेंद्र सेहवागने ट्विट केले आहे की, मोहम्मद शमीवरील ऑनलाइन हल्ल्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही मोहम्मद शमीच्या पाठीशी उभे आहोत, तो एक चॅम्पियन आहे आणि जो कोणी खेळाडू इंडियन कॅप परिधान करतो त्याच्या मनात भारत आहे. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत, पुढील सामन्यात तुझा जलवा दाखव.
The online attack on Mohammad Shami is shocking and we stand by him. He is a champion and Anyone who wears the India cap has India in their hearts far more than any online mob. With you Shami. Agle match mein dikado jalwa.
— Virender Sehwag (@virendersehwag) October 25, 2021
इतर बातम्या
‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग
India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ
(after india vs pakistan match Mohammed Shami faces online abuse many cricketers stood with him)