‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारताचा 10 विकेट्सनी दारुण पराभव केला. क्रिकेटच्या मैदानात झालेल्या या सामन्यानंतर आता सोशल मीडियासह विविध प्लॅटफॉर्मवर विविध विधानांनी नवा खेळ सुरु झाला आहे.

'हा तर इस्लामचा विजय', पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग
शेख राशीद
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 9:54 PM

T20 World Cup 2021 : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगला. पाकिस्तानने भारताला अगदी सहज पराभूत केलं. आधी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज हताश झाले तर नंतर भारतीय गोलंदाजाना पाकच्या एकाही खेळाडूला बाद करता आलं नाही. त्यामुळे पाकने 10 विकेट्सनी विजय मिळवला. पण या सामन्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत सोशल मीडियासह विविध ठिकाणी याच सामन्याची चर्चा आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकजण यावरच चर्चा करत असून जगभरातील क्रिकेटपटू आपआपली मतं व्यक्त करत आहेत. दरम्यान आनंदी असणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकांनी अजब वक्तव्य करायला सुरुवात केली आहे. यामध्ये पंतप्रधान इम्रान खान सरकारमधील शेख राशीद (sheikh rashid) या नेत्याने या सामन्याला धर्माचा रंग देण्याचा प्रकार केला आहे.

पाकिस्तानने तब्बल 14 वर्षानंतर विश्वचषक स्पर्धेत तर टी20 विश्वचषकात प्रथमचं भारताला पराभू केलं. या मोठ्या विजयानंतर पाकिस्तानमधील सर्वच जनता आनंदी असून अनेक विधानं आता समोर येत आहेत. पण यामध्ये पाकिस्तानचे गृहमंत्री असणारे शेख राशीद यांचं विधान सर्वात विचित्र आहे. त्यांनी या विजयाला इस्लांचा विजय असल्याचं वक्तव्य केलं आहे. यातून एका खेळाला धर्माचा रंग देत राशीद यांनी हे विधान केलं आहे.  

‘भारतीय मुसलमानांनाही पाकिस्तानचाच विजय हवा होता’

राशीद यांनी सामन्यानंतर पाकिस्तान संघाचं अभिनंदन केलं. पण याचवेळी विचित्र विधानं देण्यास सुरुवात केली. त्यांनी या विजयाला इस्लामचा विजय असल्याचं तर म्हटलंच. पण सोबतच भारतीय मुसलमानही पाकिस्तानचा विजय व्हावा असं चिंतत असल्याचंही म्हटलं. ते भारतासोबत नाही तर पाकिस्तानसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

इम्रान खान यांनी राशीदना बोलावलं परत

राशीद  हे बहुतांश भारत-पाक सामने मैदानात पाहायला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाही ते युएईला गेले होते. पण त्यांना सामन्याआधी परत यावं लागलं. सूत्रांच्या माहितीनुसार सुरक्षासंबधी कामांमुळे प्रधानमंत्री इम्रान खान यांनीच त्यांना माघारी बोलावलं होतं.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

(After India vs Pakistan match Pakistan minister sheikh rasheed says this is Victory of Islam)

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....