IPL 2022: DK सिर्फ नाम ही काफी हैं! 3 वर्ष झोपलेले जागे झाले
फिनिशर म्हणून त्याने अनेक सामन्याच मॅच विनिंग परफॉर्मन्स दिले आहेत. दिनेश कार्तिकच वय 36 असलं, तरी त्याच्या कामगिरीकडे कुठल्याही सिलेक्टरला डोळेझाक करता येणार नाही.
मुंबई: सध्या क्रिकेट चाहत्यांवर आयपीएलचा ज्वर चढला आहे. IPL 2022 स्पर्धा लीग स्टेजच्या अंतिम टप्प्यात आहे. इंडियन प्रीमियर लीगचा सीजन संपल्यानंतर भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएल (IPL) नंतर टीम इंडिया लगेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका (Ind vs Sa T 20 Series) खेळणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्याआधी भारतीय संघ महत्त्वांच्या मालिकांमध्ये खेळणार आहे. वर्ल्डकप आधी होणाऱ्या मालिकांमध्ये तुम्हाला अनेक नवे चेहरे पहायला मिळतील, ज्यांनी टी-20 वर्ल्ड कपचा विचार करुनच संघात संधी मिळेल. संधी मिळणाऱ्या प्लेयर्समध्ये प्रमुख नाव आहे, दिनेश कार्तिक. (Dinesh Karthik) आरसीबीच्या या फलंदाजाने IPL 2022 मध्ये आयपल्या कामगिरीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
दिनेश कार्तिक शेवटचा सामना कधी खेळला?
फिनिशर म्हणून त्याने अनेक सामन्याच मॅच विनिंग परफॉर्मन्स दिले आहेत. दिनेश कार्तिकच वय 36 असलं, तरी त्याच्या कामगिरीकडे कुठल्याही सिलेक्टरला डोळेझाक करता येणार नाही. त्यामुळे दिनेश कार्तिक 3 वर्षानंतर टीम इंडियात पुनरागमन करु शकतो. 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध दिनेश कार्तिक भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर दिनेश कार्तिकला संघाबाहेर करण्यात आलं. त्याची पुन्हा निवड झाली नाही.
RCB ने DK वर बोली लावली आणि कमाल झाली
परिस्थिती अशी झाली होती की, दिनेश कार्तिक कॉमेंट्री करत होता. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये RCB ने दिनेश कार्तिकवर बोली लावली आणि त्याने कमाल करुन टाकली. दिनेश कार्तिकच्या फलंदाजीने टीम इंडियाचे निवडकर्ते प्रचंड खूश आहेत. ते दिनेशची फलंदाजी पाहून प्रभावित झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T 20 सीरीजसाठी संघ निवडताना दिनेशच्या नावाचा विचार होणार आहे.
निवड समितीच्या सदस्याने काय म्हटलं?
दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T 20 सीरीजसाठी एक प्रमुख दावेदार आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सर्वच खेळाडूंसाठी दरवाजे खुले आहेत, असं निवड समितीच्या सदस्याने म्हटलं आहे. माजी हेड कोच रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांनी फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकची भारतीय संघात निवड करण्याची मागणी केली आहे.