Kieron Pollard announces retirement: ‘पॉली वी मिस यु’, Twitter वर भावनांचा पूर
Kieron Pollard announces retirement: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला प्रसिद्ध क्रिकेटपटू कायरन पोलार्डने आज अचानक तडकाफडकी निवृत्ती जाहीर (Kieron Pollard announces retirement) केली.
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला प्रसिद्ध क्रिकेटपटू कायरन पोलार्डने आज अचानक तडकाफडकी निवृत्ती जाहीर (Kieron Pollard announces retirement) केली. हिटर म्हणून ओळखला जाणाऱ्या पोलार्डमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. पोलार्ड फलंदाजी बरोबर गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. त्यामुळे अव्वल ऑलराऊंडर्समध्ये (All rounders) त्याचा समावेश होतो. कॅरिबियाई क्रिकेटपटूंची खासियत म्हणजे ते मोठे फटके सहज खेळतात. कायरन पोलार्डही त्याच परंपरेतला. त्यामुळे वेस्ट इंडिजप्रमाणे (West indies) भारतातही तो तितकाच लोकप्रिय. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो. आयपीएलमध्ये त्याने अनेक प्रतिस्पर्धी संघांना आपल्या बॅटचा हिसका दाखवला आहे. आपल्या वादळी खेळीने त्याने मुंबई इंडियन्सला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
पोलार्ड संपल्याची चर्चा
त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये पॉलीची एक वेगळी लोकप्रियता आहे. आयपीएलच्या प्रत्येक सीजनआधी कायरन पोलार्डची बरीच चर्चा होते. कारण तो खेळाडूच तसा आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही पोलार्डची चर्चा आहे. पण नावाप्रमाणे अजून त्याची जादू दिसलेली नाही. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ सातत्याने पराभवाचा सामना करतोय. पोलार्ड खेळपट्टीवर असूनही तो सामने जिंकवून देऊ शकलेला नाही. त्यामुळे पोलार्ड संपला अशी चर्चा सुरु झाली होती.
Thank you polly for your contribution world cricket remember him❤
Happy retirement polly?#polly pic.twitter.com/OVqc9KG4eF
— ❤??????????❤ (@subhashree__45) April 20, 2022
#polly thank you for everything polly???? happy retirement and hope u will play some more matches for @mipaltan ? true legend ? pic.twitter.com/MAz0TCWhcP
— RRR(Reddy,RC,RO45)??️? (@RamRohithReddy) April 20, 2022
टि्वटरवर भावनांचा पूर
यंदाच्या सीजनमध्ये तो जुना पोलार्ड दिसलेला नाही. या चर्चा सुरु असतानाच आयपीएलच्या मध्यावरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. पोलार्डच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर टि्वटरवर अनेकांनी भावनात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Thank you ❤ for your mesmerizing memories #Legend we miss you??@KieronPollard55 always in our hearts❤? #polly pic.twitter.com/GXnoj73WWm
— Mohammad Abid (@Mohamma13619259) April 20, 2022
The big man #pollard give us too much memories with 6 balls 6 sixes @KieronPollard55 your bats beauty man ! Thank you for entertaining us ❤️ Best wishes for your next innings #polly #kieronpollard pic.twitter.com/a4mTfpbKvU
— RUSHIKESH KANHAIYE (@Rushikesh__04) April 20, 2022
You’ll be always my favorite! #polly #pollard DEFINITELY GONNA MISS YOU.???. G.O.A.T pic.twitter.com/JOt8YCqsMU
— Garima arora (@garimarora_) April 20, 2022
पोलार्डने किती सामन्यात विंडिजच नेतृत्व केलं?
पोलार्ड वेस्ट इंडिजसाठी 123 वनडे आणि 101 टी 20 सामने खेळला. पोलार्ड वेस्ट इंडिजसाठी कधीही कसोटी सामना खेळला नाही. वनडे आणि टी 20 खेळाडू म्हणूनच पोलार्डकडे पाहिलं गेलं. वनडे आणि टी 20 अशा दोन्ही फॉर्मेटमध्ये पोलार्डने 61 सामन्यात वेस्ट इंडिजचं नेतत्व केलं. त्यात 25 सामने विंडिजने जिंकले तर 31 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.