IPL 2024 : शेवटचा सामना हरल्यानंतर नीता अंबानी मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन काय म्हणाल्या? VIDEO

IPL 2024 : यंदाच्या सीजनमधील शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. मुंबईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये तळाला आहे. या पराभवानंतर टीमच्या मालक नीता अंबानी ड्रेसिंग रुममध्ये गेल्या होत्या. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सची टीम या सीजनमध्ये खेळापेक्षा पण अंतर्गत मतभेद, वाद यामुळे जास्त चर्चेत राहिली.

IPL 2024 : शेवटचा सामना हरल्यानंतर नीता अंबानी मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन काय म्हणाल्या? VIDEO
Nita Ambani in dressing room of Mumbai indiansImage Credit source: X/@mipaltan
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 9:06 AM

मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा सीजन खूपच निराशाजनक ठरला. अगदी शेवटच्या सामन्यातही लखनऊ सुपर जायंट्सकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम तळाला आहे. कॅप्टन बदलूनही मुंबई इंडियन्सला काही फायदा झाला नाही. फक्त त्यांना 4 विजय मिळाले. 10 सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. सीजनमधील शेवटच्या सामन्यात टीम पराभूत झाल्यानंतर फ्रेंचायजीच्या मालक नीता अंबानी यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना आत्मविश्वास दिला. “हा आपल्यासाठी निराशाजनक सीजन होता. पण मी अजूनही मुंबई इंडियन्सची मोठी फॅन आहे टीमची जर्सी परिधान करणं हा माझा सन्मान समजते” असं नीता अंबानी म्हणाल्या.

त्यांनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना रोहित शर्मा, कॅप्टन हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा विशेष उल्लेख केला. “आपल्या सर्वांसाठी हा निराशाजनक सीजन होता. आपल्याला हवं तसं घडलं नाही. पण मी अजून मुंबई इंडियन्सची मोठी फॅन आहे. फक्त मालक म्हणून नाही, मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करण हा माझा सन्मान आहे. जे झालं, त्याचा आढावा घेऊ, विचार करु” असं नीता अंबानी म्हणाल्या. पुढच्या महिन्यात टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या मुंबई टीममधील खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

नीता अंबानी यांनी कोणाला दिल्या शुभेच्छा?

“रोहित, हार्दिक, सूर्या आणि जसप्रीत सर्व भारतीय तुमच्या पाठिशी आहेत. आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा” असं नीता अंबानी म्हणाल्या. शुक्रवारी मुंबई इंडियन्स टीमचा या सीजनमधील 10 वा पराभव झाला. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्समधील हा शेवटचा सीजन असू शकतो, अशी चर्चा आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. क्रिकेटपेक्षापण कॅप्टनशिप बदल, रोहित शर्मा-हार्दिक पांड्यामधील मतभेद, टीममधील अंतर्गत गटबाजी यामुळे मुंबई इंडियन्सची टीम यंदा जास्त चर्चेत राहिली.

बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...