MI vs CSK 2023 : मॅच नंतर Ms Dhoni ची मुंबईच्या एका खेळाडूसोबत स्पेशल मीटिंग, ‘आता पुढच्या मॅचमध्ये….’
MI vs CSK 2023 : धोनीच्या कृतीमधूनच त्याचा मोठेपणा दिसून येतो. आयपीएलच वैशिष्ट्य म्हणजे मैदानाबाहेर खेळाडू परस्परांचे चांगले मित्र असतात. आयपीएलमध्ये टीम इंडियाचे सीनियर खेळाडू ज्यूनियर्सना मार्गदर्शन करताना दिसतात.
MI vs CSK IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगच वैशिष्ट्य म्हणजे इथे स्पर्धा मैदानावर दिसते. मैदानाबाहेर खेळाडू परस्परांचे चांगले मित्र असतात. आयपीएलमध्ये टीम इंडियाचे सीनियर खेळाडू ज्यूनियर्सना मार्गदर्शन करताना दिसतात. जेणेकरुन त्या खेळाडूचा, टीम इंडियाचा फायदा व्हावा, हा त्यामागे हेतू असतो. एमएस धोनीच हे भारतीय क्रिकेटमधलं मोठं नाव. धोनीच नाव आदराने घेतलं जातं. फक्त क्रिकेट चाहतेच नाही, तर युवा, ज्यूनियर खेळाडूंसाठी सुद्धा धोनीचा सल्ला मोलाचा असतो.
धोनीच मार्गदर्शन इतकं महत्वाच का आहे? त्यामागे कारण आहे, धोनीची क्रिकेटबद्दलची समज. धोनीला क्रिकेटची उत्तम समज आहे. त्यामुळे धोनीने टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी चांगले, उत्तम दर्जाचे खेळाडू घडवलेत.
त्याच्यासोबत धोनीची दीर्घ चर्चा
याच धोनीने काल मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूला मार्गदर्शन केलं. मॅच संपल्यानंतर धोनीने वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्यासोबत दीर्घ चर्चा केली. खरंतर कालच्या मॅचमध्ये धोनीच्या चेन्नईने मुंबईवर मोठा विजय मिळवला. मॅच संपल्यानंतर धोनीने त्याला मोलाच मार्गदर्शन केलं.
सध्या धावा जणू त्याच्यावर रुसल्या आहेत
सध्या मुंबईच्या या स्टार बॅट्समनचा संघर्ष सुरु आहे. सध्या धावा जणू त्याच्यावर रुसल्या आहेत असं वाटतय. त्यामुळे धोनीच मार्गदर्शन या खेळाडूसाठी मोलाच ठरेल, या बाबत अजिबात शंका नाही. प्रत्येकाला ठाऊक आहे, सूर्यकुमार यादवाचा दिवस असेल, तर तो काय करु शकतो? त्याच्या भात्यात अनेक प्रकारचे फटके आहेत. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये सूर्याला मिस्टर 360 म्हटलं जातं.
View this post on Instagram
उपचार किती प्रभावी ते समजेलच
यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये अजूनपर्यंत सूर्याला सूर गवसलेला नाहीय. सूर्याची बॅट तळपत नाहीय. त्यामुळे निकाल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागत नाहीय. त्यामुळे काय चुकतय? हे शोधण्यासाठी सूर्यकुमार यादवने धोनीची मदत घेतली. सूर्यावर केलेले उपचार किती प्रभावी ठरलेत, ते पुढच्या सामन्यात आपल्याला समजेलच.
दोन मॅचमध्ये मुंबईच्या खेळाडूच सुमार प्रदर्शन
सूर्यकुमार यादव आणि एमएस धोनीमध्ये दीर्घ चर्चा झाली. सूर्याने आपल्या बॅटिंगबद्दल धोनीसोबत चर्चा केली. आयपीएल 2023 च्या पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादवने फक्त 16 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सूर्याने फक्त एक धाव केली. फॅन्सच्या कमेंट्स
सूर्या आणि धोनीच्या चर्चेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फॅन्सनी त्यावर वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत. पुढच्या मॅचमध्ये सूर्याची सेंच्युरी पक्की, असं फॅन्सनी म्हटलय.