Rinku Singh | टीममध्ये निवडलं नाही म्हणून रडत नाय बसला, रिंकूच 24 तासांच्या आत सिलेक्टर्सना कडक उत्तर

Rinku Singh | सूर्यकुमार यादव, चेतेश्वर पुजारा आणि सर्फराज खान हे तीन मोठे प्लेयर फ्लॉप ठरले. त्याचवेळी रिंकू सिंह उजवा ठरला.एका कठीण विकेटवर त्याने आपल्या परफॉर्मन्सने उत्तर दिलं.

Rinku Singh | टीममध्ये निवडलं नाही म्हणून रडत नाय बसला, रिंकूच 24 तासांच्या आत सिलेक्टर्सना कडक उत्तर
Rinku singhImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 3:32 PM

नवी दिल्ली : रिंकू सिंहच टीम इंडियात सिलेक्शन का झालं नाही? हा प्रश्न देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. IPL 2023 मध्ये रिंकू सिंहने आपल्या बॅटची ताकत दाखवून दिली होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 सीरीजसाठी रिंकू सिंहला टीम इंडियात स्थान मिळेल, असा सर्वांना वाटत होतं. पण काल वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 सीरीजसाठी टीमची घोषणा झाली. त्यावेळी सर्वांना धक्का बसला. त्यातून रिंकू सिंहच नाव गायब होतं.

टीममध्ये सिलेक्शन झालं नाही, म्हणून रिंकू सिंह रडत बसला नाही. त्याने 24 तासांच्या आत सिलेक्टर्सना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रिंकूने सिंहने सिलेक्टर्सना आपल्या बॅटने उत्तर दिलं.

हे सुद्धा वाचा

टीम किती रन्सवर ऑलआऊट झाली?

रिंकू सिंह दुलीप ट्रॉफीमध्ये सेंट्रल झोनकडून खेळतोय. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 48 धावा केल्या. तुम्ही म्हणाल रिंकू सिंहने फक्त 48 धावा केल्या. मग त्याने सिलेक्टर्सना उत्तर दिलं असं कसं म्हणता. अल्लूरमध्ये दुलीप ट्रॉफीच्या सेमीफायनलचा सामना सुरु आहे. सेंट्रल झोनची टीम पहिल्या इनिंगमध्ये 128 रन्सवर ऑलआऊट झाली.

View this post on Instagram

A post shared by Rinku ? (@rinkukumar12)

रिंकू सिंहने वाचवली लाज

यात 48 धावा एकट्या रिंकू सिंहच्या आहेत. रिंकू सिंहने कठीण परिस्थितीत टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रिंकूच्या विकेटबरोबर सेंट्रल झोनचा डाव संपला. म्हणजे रिंकू सिंह शेवटपर्यंत लढत होता. अल्लूरची विकेट गोलंदाजांना अनुकूल आहे. त्या विकेटवर रिंकूने 69 चेंडूत 48 धावा केल्या.

सूर्यकुमार, पूजारापेक्षा रिंकू सिंह सरस

दुलीप ट्रॉ़फीमध्ये वेस्ट झोनकडून सूर्यकुमार यादव, चेतेश्वर पुजारा आणि सर्फराज खान खेळतायत. हे तिन्ही प्लेयर मिळून पण एकट्या रिंकू सिंह एवढ्या धावा करु शकले नाहीत. सूर्यकुमार यादवने पहिल्या इनिंगमध्ये फक्त 7 धावा केल्या. सर्फराज खान खातही उघडू शकला नाही. पुजाराने 28 धावा केल्या. ज्या पीचवर तीन मोठे प्लेयर फ्लॉप ठरले, तिथे रिंकू सिंह सरस ठरला. सिलेक्टर्स रिंकू सिंहच्या परफॉर्मन्सकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा आहे. टीम इंडियात आता त्याला स्थान मिळालेलं नाही. पण भविष्यात त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.