IND vs PAK : भारताकडून हार सहन नाही झाली, पाकिस्तानचा हा क्रिकेटर मैदानातच रडला, VIDEO
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना म्हणजे फक्त क्रिकेटची मॅच नसते, इथे तुमच्या मानसिक कणखरतेची परीक्षा असते. दबाव झेलण्याची तुमची किती क्षमता आहे, त्याचा कस लागतो. त्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना अनेक क्रिकेटपटूंच करिअरही घडवतो. पाकिस्तानाच्या एका प्लेयरला भारताकडून झालेला पराभव सहन झाला नाही, त्याला मैदानातच रडू कोसळलं.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे करो या मरो. या मॅचमध्ये पराभव दोन्ही बाजूंना अजिबात मान्य नसतो. त्यामुळे या मॅचमध्ये दोन्ही टीम्स सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. काल T20 वर्ल्ड कपच्या सामन्यातही हेच दिसून आलं. अमेरिकेच्या न्यू यॉर्क येथील स्टेडियममध्ये दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या होत्या. भारत-पाकिस्तान सामन्यात सर्वोत्तम क्रिकेट पहायला मिळतं. क्रिकेटचा एक वेगळा थरार, रोमांच अनुभवायला मिळतो. काल T20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना अशाच अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. पाकिस्तानची गोलंदाजी विरुद्ध भारताची फलंदाजी अशी ही लढत होती. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. जसप्रीत बुमराह टीम इंडियाकडून या विजयाचा नायक ठरला.
मॅच संपल्यानंतर मैदानावर एक वेगळ दृश्य पहायला मिळालं. पाकिस्तानी टीममधील एका क्रिकेटपटूला हा पराभव जराही सहन झाला नाही. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. मैदानावरच या क्रिकेटरला रडू कोसळलं. महत्त्वाच म्हणजे पाकिस्तानच्या विजयासाठी त्याने आपल्या बाजूने सर्वोत्तम प्रदर्शन केलं होतं. पाकिस्तानला जी अपेक्षा होती, तसा निकाल लागला नाही. नसीम शाह हा जागतिक क्रिकेटमधील एक उदयोन्मुख स्टार आहे. अटी-तटीच्या सामन्यात टीम इंडियाच बाजी मारणं, त्याला खूप जिव्हारी लागलं.
Even Naseem Shah, our young bowler, played better than our highly paid batsmen. The time has come, if you’re not performing well, please resign gracefully and let others join. It’s time to take strict decisions, or they’ll never understand. #PakvsIndpic.twitter.com/kkV9LZntFX
— Saad Kaiser 🇵🇰 (@TheSaadKaiser) June 9, 2024
शेवटच्या 3 चेंडूत विजयासाठी किती धावा हव्या होत्या?
टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांच लक्ष्य दिलं होतं. पाकिस्तानी टीम निर्धारित 20 षटकात 7 बाद 113 धावाच करु शकली. 6 धावांनी टीम इंडियाने बाजी मारली. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील हा दुसरा विजय असून त्यांनी ग्रुप A मधील आपलं स्थान अधिक भक्कम केलं आहे. शेवटच्या तीन चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 16 धावांची गरज होती. फलंदाजीसाठी मैदानात नसीम शाह होता. त्याच्या खाद्यांवर विजयाचा भार होता. अर्शदीपच्या गोलंदाजीवर त्याने दोन चौकार मारले. पण तो टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. आपण टीमला विजय मिळवून देऊ शकलो नाही, याची खंत त्याच्या मनामध्ये होती. त्याला मैदानावर रडू कोसळलं.