WTC Final 2023 : Rahul dravid यांच्याकडे आता फक्त दोन संधी, अन्यथा ‘हे’ तीन दिग्गज घेऊ शकतात त्यांची जागा
WTC Final 2023 : Rahul dravid यांची जागा घेण्यासाठी तीन दावेदार कोण?. कॅप्टन रोहित शर्मापेक्षा पण राहुल द्रविड यांच्यासमोर मोठ आव्हान आहे. ही अग्निपरीक्षा राहुल द्रविड यांच्यासाठी सोपी नाहीय.
मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासाठी हे वर्ष चॅलेंजिंग आहे. त्यापेक्षाही मोठ आव्हान हेड कोच राहुल द्रविड यांच्यासमोर आहे. यावर्षी मायदेशात वनडे वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंट होणार आहे. हा वर्ल्ड कप जिंकणं हे टीम इंडियासमोरच मुख्य टार्गेट आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांची ही सर्वात मोठी अग्निपरीक्षा असेल.
मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कप 2022 जिंकण्याची संधी टीम इंडियाने गमावली. सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियावर 10 विकेटने एकतर्फी विजय मिळवला. कोच म्हणून राहुल द्रविड यांच्यासाठी भारतात होणारी वर्ल्ड कप स्पर्धा सर्वात मोठी टेस्ट आहे.
दबाव सर्वात जास्त असेल
राहुल द्रविड यांच्यावर यावर्षी भारतात होणारा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचा दबाव असेल. वर्ल्ड कप आधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुद्धा एक टेस्ट आहे. मागच्या 10 वर्षापासून टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. या दोन टुर्नामेंट्स म्हणजे राहुल द्रविड यांच्यासाठी दोन संधी आहेत. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा जिंकण्याची संधी गमावली, तर राहुल द्रविड यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते. टीम इंडियात राहुल द्रविड यांची जागा घेण्यासाठी 3 दावेदार आहेत.
तो कोच बनल्यास बरच चित्र बदलेल
टीम इंडियाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी भारतीय क्रिकेट टीमचा पुढचा कोच बनण्यासाठी दावेदार आहे. द्रविड यांच्याजागी धोनी कोच बनल्यास बरच चित्र बदलू शकतो. कारण धोनीने स्वत:च्या कॅप्टनशिपमध्ये विजेता संघ बांधला होता. वर्ल्ड कप सारखी स्पर्धा कशी जिंकायची? हे धोनीला चांगल माहितीय. एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. धोनीने नुकतच चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलची पाचवी ट्रॉ़फी जिंकून दिली.
टीम इंडियाला तो आक्रमक बनवेल
भारताचा माजी कोच वीरेंद्र सेहवाग सुद्धा टीम इंडियाचा कोच बनण्यासाठी दावेदार आहे. सेहवाग आक्रमक बॅटिंग करायचा. कोच म्हणून तो तशीच कामगिरी करु शकतो. टीम इंडियाला कोचिंगमध्ये आक्रमक होण्याची गरज आहे. कुठलाही दबाव न घेता बिनधास्त खेळण्यासाठी प्रेरणा देणारा कोच हवा आहे. सेहवागच नावही अनेकदा कोच पदासाठी चर्चेत आलं होतं. एक परदेशी प्रशिक्षक सुद्धा कोचपदाच्या शर्यतीत
न्यूझीलंडचे माजी कोच माइक हेसन सुद्धा टीम इंडियाचे पुढचे कोच बनण्यासाठी दावेदार आहेत. माइक हेसन यांच्या कोचिंगमध्ये न्यूझीलंडने 2015 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड टीमने परदेशात जाऊन टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरीज जिंकली आहे. माइक हेसन आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स आहेत. कोहलीसोबत त्यांच उत्तम बॉन्डिंग आहे.