सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर ही महिन्याला कमवतोय करोडो रुपये, इतकी आहे संपत्ती

Sachin Tendulkar Net worth : टीम इंडियाचा भाग राहिलेला महान खेळाडू सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेऊन बरीच वर्ष झाले आहेत. असं असलं तरी तो अजूनही महिन्याला करोडो रुपये कमवतो. सचिनची मुंबईसह अनेक ठिकाणी घरे आहेत. ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे, जाणून घ्या सचिनची संपत्ती किती आहे.

सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर ही महिन्याला कमवतोय करोडो रुपये, इतकी आहे संपत्ती
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 4:51 PM

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. सचिन भारतासाठी 24 वर्ष खेळला. त्याने वनडे आणि टेस्ट सामन्यांमध्ये असे विक्रम केले जे अजून कोणालाही जमलेलं नाही. त्यामुळेच त्याला सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देवही म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत एकूण 100 शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकर आज खेळत नसला तरी निवृत्तीच्या नंतर ही तो करोडो रुपये वर्षाला कमवतो. वयाची पन्नाशी ओलांडलेला सचिन कुठून कमावतो आणि आता त्याची नेट वर्थ किती आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सचिनची एकूण संपत्ती किती

सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 15,921 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18,426 धावा आहेत. पण धावांच्या बाबतीत सर्वात वर असलेल्या सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती ही 1410 कोटी रुपये आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आता जाहिराती आहेत. क्रिकेटमधून निवृत्तीच्या इतक्या दिवसांनंतरही सचिन तेंडुलकरचे मासिक उत्पन्न ४ कोटींहून अधिक आहे, तर वार्षिक उत्पन्न ५५ कोटींहून अधिक आहे. सचिन तेंडुलकर ITC Savlon, Jio Cinema, Spinny, Apollo Tyres आणि Ageas Federal Life Insurance सारख्या कंपन्यांच्या जाहिरातीे केल्या आहेत.

सचिनची संपत्ती कोहली आणि धोनीपेक्षा जास्त आहे

सचिन तेंडुलकरचे मुंबईतील अत्यंत पॉश भागात वांद्रे येथे अलिशान घर आहे. त्याच्या बंगल्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. 2007 मध्ये त्याने बांद्रा कुर्ला येथे 40 कोटी रुपयांचा एक आलिशान फ्लॅटही खरेदी केला होता. सचिनचा मुंबईशिवाय केरळमध्ये देखील आलिशान बंगला असून इंग्लंडमध्येही त्याचे घर आहे.

अनेक महागड्या गाड्या

सचिनचे मुंबई आणि बंगळुरू येथे दोन रेस्टॉरंट देखील आहेत. या गुंतवणुकीतून तो 10 कोटी रुपये कमावतो. सचिनची एकूण संपत्ती विराट कोहली (1018 कोटी) आणि महेंद्रसिंग धोनी (1060 कोटी) पेक्षा जास्त आहे. सचिनकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. सचिनकडे निसान GT R, BMW i8, BMW M5, Mercedes Benz, BMW X5M, BMW M6 सारख्या कार आहेत.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.