इंग्लंडमध्ये रोहित शर्मानंतर आता आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण, स्पर्धेतून बाहेर
इंग्लंडमध्ये लसीच्या दोन डोस नंतर बूस्टर डोसही (Booster Dose) देण्यात आले आहेत. पण अजूनही तिथे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. एकापाठोपाठ एक क्रीडा कार्यक्रमांवर कोरोनाचा परिणाम दिसून येतोय.
मुंबई: इंग्लंडमध्ये लसीच्या दोन डोस नंतर बूस्टर डोसही (Booster Dose) देण्यात आले आहेत. पण अजूनही तिथे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. एकापाठोपाठ एक क्रीडा कार्यक्रमांवर कोरोनाचा परिणाम दिसून येतोय. भारतीच क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झालीय. तेच विम्बलडन खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या मारिन सिलिचलाही (Marin cilic) कोरोनाची लागण झालीय. मारिन सिलिच दिग्गज टेनिसपटू आहे. विम्बलडनचा फायनलिस्ट राहिलेल्या क्रोएशियन स्टार सिलिचने सोमवारी त्याला कोरोनाची लागण झाल्याची आणि स्पर्धेत खेळता येणार नसल्याची माहिती दिली. 33 वर्षाच्या मारिन सिलिचने 2014 साली अमेरिकन ओपनचा किताब जिंकला होता. पाच वर्षापूर्वी तो विम्बलडन फायनलमध्येही पोहोचला होता. तिथे रॉजर फेडररने त्याला पराभूत केलं होतं.
तुम्हा सर्वांना सांगताना खूप दु:ख होतय
मारिन सिलिचने सोशल मीडियावरुन त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. “मला कोरोना झालाय, हे तुम्हा सर्वांना सांगताना खूप दु:ख होतय. मी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. मी वेळेत फिट होईन असं वाटलं होतं, पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. मला बरं वाटत नाहीय. अशावेळी मी माझं सर्वोत्तम प्रदर्शन करु शकत नाही” असं त्याने सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
विम्बलडनमध्ये 14 वी रँकिंग
मारिन सिलिचला विम्बलडनमध्ये 14 वी रँकिंग मिळाली होती. तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. फ्रेंच ओपन स्पर्धेत सेमी फायनलपर्यंत पोहोचला होता. त्या शिवाय ग्रास कोर्टवर ATP 500 मध्ये टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं होतं. विम्बलडनमध्ये आता मारिन सिलिचच्या जागी पोर्तुगालचा नुनो बोर्ग्स खेळणार आहे. स्पर्धेच्या आयोजकांकडून ही माहिती देण्यात आली.