Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup: सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी BCCI घेतला महत्त्वाचा निर्णय

आयर्लंड (Ireland) विरुद्धच्या सामन्याआधी भारताचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह ठरले होते. भारताने आपला 17 सदस्यीय संघ वेस्ट इंडिजला पाठवला आहे.

U19 World Cup: सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी BCCI घेतला महत्त्वाचा निर्णय
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 3:28 PM

गयाना: वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत (U19 World Cup)भारतीय संघाचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. पण दुसऱ्याबाजूला कोरोनाचही सावट आहे. आयर्लंड (Ireland) विरुद्धच्या सामन्याआधी भारताचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह ठरले होते. भारताने आपला 17 सदस्यीय संघ वेस्ट इंडिजला पाठवला आहे. त्यातल्या सहाजणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे फक्त अकराच खेळाडू उरले होते. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ त्या उर्वरित 11 खेळाडूंनाच घेऊन मैदानावर उतरला होता. टीमकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. पुढच्या सामन्यांमध्ये अडचणी वाढू नयेत, यासाठी बीसीसीआयने (BCCI) स्पर्धेआधी रिजर्वमध्ये ठेवलेल्या पाच खेळाडूंना वेस्ट इंडिजला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ अंडर 19 वर्ल्डकपच्या ग्रुप बी मध्ये आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात सहा खेळाडू कोरोनाग्रस्त असूनही आयर्लंडला 174 धावांनी नमवले होते. भारताला ग्रुप स्टेजवर तिसरा सामना युगांडा विरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यातही भारत आयर्लंड विरुद्ध खेळलेल्या 11 खेळाडूंना घेऊन उतरणार आहे.

BCCI पाच रिजर्व खेळाडूंना वेस्ट इंडिजला पाठवणार ग्रुप स्टेजनंतर नॉकआऊटचे सामने सुरु होतील. म्हणजे इथे पराभव झाल्यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही. कोरोनामुळे भारतीय संघाच्या अडचणी आणखी वाढू नयेत, यासाठी बीसीसीआयने उध्यम सहारन, विकेटकिपर फलंदाज अभिषेक पोरेल, रिथीश रेड्डी, अंश गोसाई आणि पीएम सिंह राठोड यांना वेस्ट इंडिजला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

After six players corona positive bcci to send in 5 reserve players for u19 world cup

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.