इंग्लंड दौऱ्यादरम्यान मोठी बातमी, टीम इंडिया न्यूझीलंडला भिडणार, 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची सीरीज
मायदेशात भारताविरुद्ध मालिका झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान आणि भारत दौऱ्यावर येणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतेल.
मुंबई: ऑस्ट्रेलियामधील टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) संपताच भारतीय संघ न्यूझीलंड (India newzeland tour) दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ तीन वनडे (Three odi) आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी ही माहिती दिली. 18 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही सीरीज आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढच्यावर्षी न्यूझीलंडचा संघ मर्यादीत षटकांच्या सामन्यासाठी भारतात येईल. वर्ल्ड कप संपल्यानंतर भारतीय संघ वेलिंगटन, तौरंगा आणि नेपियरमध्ये तीन टी 20 आणि ऑकलंडमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडमध्ये येणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. मागच्यावेळी भारताने न्यूझीलंडचा त्यांच्याच देशात टी 20 सीरीजमध्ये पराभव केला होता.
इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार
मायदेशात भारताविरुद्ध मालिका झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान आणि भारत दौऱ्यावर येणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतेल. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. भारत शुक्रवारपासून इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. मागच्यावर्षी बाकी राहिलेल्या मालिकेतील हा सामना आहे. त्यानंतर दोन्ही संघ तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळतील.
जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौरा
भारतीय संघ इंग्लंडचा दौरा संपल्यानंतर तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टी 20 वर्ल्ड कप आधी हा दौरा होईल. पुढच्या महिन्यात इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्याची सीरीज होणार आहे. त्यासाठी मजबूत संघ मैदानात उतरवला जाईल. त्यासाठी आयर्लंड़ दौरा हा युवा खेळाडूंकडे आपली क्षमता दाखवण्याची संधी आहे. इंग्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा वर्ल्ड कपसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात जास्त विचार होऊ शकतो.