Team India : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियासोबत फोटोमध्ये दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण?
Team India : टीम इंडियाने T20 World Cup 2024 जिंकल्यानंतर ड्रेसिंग रुममधला एक व्हिडिओ शेअर केलाय. ड्रेसिंग रुममध्ये ही मुलगी दिसल्यानंतर ती कोण आहे? अशी चर्चा फॅन्समध्ये सुरु झाली. ही मिस्ट्री गर्ल कोण होती?. ही मिस्ट्री गर्ल पहिल्यांदा नाही, तर याआधी अनेकदा टीम इंडिया सोबत दिसली आहे.
T20 World Cup 2024 ची चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर टीम इंडियाने सोशल मीडिया व्यापून टाकला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसवर खेळाडूंचे वेगवेगळे फोटो समोर येत आहेत. लोकांना हे फोटो आवडले असून ते शेअर केले जातायत. या दरम्यान बीसीसीआयने आपल्या एक्स अकाऊंटवर ड्रेसिंग रुममधला एक व्हिडिओ शेअर केलाय. यात एक मुलगी दिसत आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यापासून अनेकदा ही मुलगी टीम इंडियासोबत दिसली आहे. ड्रेसिंग रुममध्ये ही मुलगी दिसल्यानंतर ती कोण आहे? अशी चर्चा फॅन्समध्ये सुरु झाली. ही मिस्ट्री गर्ल कोण होती? ड्रेसिंग रुममध्ये ती काय करत होती? जाणून घेऊया.
ही मिस्ट्री गर्ल पहिल्यांदा नाही, तर याआधी अनेकदा टीम इंडिया सोबत दिसली आहे. याआधी टीम इंडिया मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी सुद्धा या मिस्ट्री गर्लची चर्चा होती. भारतीय टीमचा सदस्य रिंकू सिंहने एक फोटो शेअर केलला, त्यात ही मिस्ट्री गर्ल दिसलेली. त्याआधी एमएस धोनी आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासोबत सुद्धा या मिस्ट्री गर्लचे फोटो समोर आलेत.
कोण आहे राजलक्ष्मी अरोडा?
या मिस्ट्री गर्लच नाव राजलक्ष्मी अरोडा आहे. ती रजल अरोडा या नावाने ओळखली जाते. रजल अरोडा आधी पत्रकार होती. तिने न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रासाठी रिपोर्टिंग केलय. त्यानंतर ती कंटेट रायटर बनली. खेळाची आवड असल्यामुळे ती क्रीडा क्षेत्राशी जोडलेली होतीच. आधी आयपीएल आणि मागच्या 9 वर्षापासून टीम इंडियाशी संबंधित आहे.
ते सर्व तिच्याच देखरेखीखाली होतं
रजलने पुण्याच्या सिम्बायोसिस इंस्टीट्यूट ऑफ मीडिया एंड कम्यूनिकेशनमधून शिक्षण घेतलं आहे. रजल टीम इंडियामध्ये डिजिटल प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करते. भारतीय टीमसोबत ती प्रत्येक दौऱ्यावर असते. भारतीय टीम किंवा बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जे फोटो, व्हिडिओ शेअर होतात, ते सर्व रजल अरोडाच्या देखरेखीखालीच होतं. रजल टीमच सोशल मीडिया हँडल करते. खेळाडूंच्या इंटरव्यूपासून ड्रेसिंग रुम आणि मैदानातील क्षणांचे जे फोटोज सोशल मीडियावर येतात, त्यात रजल अरोडाचा सहभाग असतो.
Rahul Dravid with the unsung heroes of Indian cricket after the World Cup win. 🫡 pic.twitter.com/z0A4hMDb7g
— Johns. (@CricCrazyJohns) July 3, 2024
कुठल्या खेळाडूच्या पत्नीसोबत खास मैत्री?
रजल भारतीय संघात सपोर्टिंग स्टाफमध्ये एकमेव महिला सदस्य आहे. खेळाडूंच्या पत्नीसोबतही तिची मैत्री आहे. केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी सोबत तिची चांगली मैत्री आहे. दोघींना अनेकदा फोटोमध्ये एकत्र पाहिलय. रजलचे इंस्टाग्राम अकाऊंटवर 81.5K फॉलोवर्स आहेत.