मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी

इकडे 14 नोव्हेंबरला T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता घोषित होईल आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट मातृभूमीत विविध अशा चार संघाशी सामने खेळायला सुरुवात करेल. याची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणार आहे.

मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी
रोहित शर्मा आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 6:01 PM

मुंबई:  बहुप्रतिक्षित T20 वर्ल्ड कपला (ICC T20 World Cup) काही दिवसांत सुरुवात होणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे गही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघ पुढील वेळापत्रकही समोर आलं आहे. भारतीय संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. दरम्यान यावेळी न्यूझीलंडचा दौैरा सर्वात पहिला असून यादरम्यान टी20 सामन्यांवेळी रोहित शर्मा, विराट यांच्यासह वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती म्हणून संघाबाहेर ठेवलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विश्वचषकाची फायनल 14 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड संघाच्या दौऱ्याची सुरुवात होईल. या दौऱ्यात 3 टी20 सामन्यांसह 2 कसोटी सामनेही खेळवले जाणार आहे. दरम्यान कसोटी सामने हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ज्यामुळे आधी होणाऱ्या टी20 मालिकेवेळी भारताच्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यासारखी नावं आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध युवा खेळाडूंना संधी

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘अधिक भारतीय खेळाडू विशेषत: वरिष्ठ खेळाडू हे मागील बरेच महिने विविध दौऱ्यांमुळे सतत बायोबबलमध्ये आहेत. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपनंतर त्यांना काहीशी विश्रांती देण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 सामन्यात त्यांना संघाबाहेर ठेवले जाणार आहे. यामध्ये कोहली, बुमराह, शर्मा आणि शमी यांची नाव असतील. यावेळी ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर या युवा खेळाडूंना संधी दिली जाईल.

द्रविडकडे पुन्हा हेड कोचची जबाबदारी

श्रीलंका दौऱ्यावर भारताचा मुख्य प्रशिक्षक असणारा राहुल द्रविड याला आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठीही हेड कोच केलं जाऊ शकतं. टी20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक पद सोडणार आहेत. तोवर दुसरा प्रशिक्षक नेमणार की नाही हे अद्याप माहित नसल्याने त्यावेळी राहुललाच ही जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

न्यूझीलंड संघाचा भारत दौरा

17 नोव्हेंबर रोजी या दौऱ्याची सुरुवात होईल. यावेळी पहिला T20 सामना जयपुरमध्ये, दुसरा T20 सामना 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये आणि तिसरा आणि शेवटचा T20 सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाईल. T20 मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी 25 नोव्हेंबर ते  29 नोव्हेंबर दरम्यान कानपुरच्या ग्रीन पार्क येथे खेळवली जाईल. त्यानंतर दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात मुंबच्ईया वानखेड़े मैदानात खेळवली जाईल.

इतर बातम्या

KKR फायनलमध्ये पण दिनेश कार्तिकला शिक्षा, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी, IPL ने फटकारले

IPL 2021: दिल्लीविरुद्ध केकेआर सामन्यात पाहायला मिळालं अजब दृश्य, तंबूत परतलेल्या शिमरॉनला पंचानी पुन्हा बोलवलं, नेमकं काय घडलं?

1 झेल 3 खेळाडू तरीही अपयश, LIVE सामन्यातील हा VIDEO पाहाच!

(After T20 World Cup Virat kohli rohit sharma and senior players will rest and young players will play in t20 home series against new zealand)

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.