Mohammed Shami | चेंडू डोक्यावर रगडून शमीने कोणाला केला इशारा? अखेर झाला खुलासा
Mohammed Shami | मोहम्मद शमी वर्ल्ड कप इतिहासातील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाल्यापासून मोहम्मद शमी आग ओकणारी गोलंदाजी करतोय. त्याने आधी न्यूझीलंड, नंतर इंग्लंड आणि आता श्रीलंकेला दणका दिलाय. मोहम्मद शमीची गोलंदाजी खेळण सोप नाहीय. पहिले चार सामने बाहेर बसल्यानंतर शमी भन्नाट बॉलिंग करतोय.
मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी वर्ल्ड कप 2023 स्पर्धा खूप शानदार आहे. त्याने 3 मॅचमध्ये 14 विकेट काढलेत. टीम कॉम्बिनेशनमुळे मोहम्मद शमी सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. पण आता त्याला संधी मिळाली आहे. शमीने गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 18 रन्स देऊन 5 विकेट काढले. वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा शमीने 5 विकेट काढल्या. वर्ल्ड कप इतिहासातील तो सर्वात यशस्वी गोलंदाज बनलायय. शमीच्या नावावर 14 सामन्यात 45 विकेट आहेत. त्याने जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांचा रेकॉर्ड मोडला. दोघांनी मिळून प्रत्येकी 44 विकेट घेतले होते.
इतकच नाही, शमीने वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिकवेळा 5 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. दिग्गज स्पिनर हरभजन सिंगचा रेकॉर्ड त्याने मोडला. हरभजनने 3 वेळा 5 विकेट घेतले होते. शमीने हीच कामगिरी 4 वेळा केलीय. श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्यानंतर शमीने आपल्या डोक्यावर चेंडू ठेवून ड्रेसिंग रुमकडे इशारा केला. शमीने कोणाला हा इशारा केला? हा फॅन्सना पडलेला प्रश्न आहे.
No better feeling than to get a fifer in a winning cause 👌🏻
Wankhede stadium 🏟️ you were special #TeamIndia on the charge 😎 #CWC23 pic.twitter.com/mwip4PXkCC
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 2, 2023
शमीनेच सांगितलं कोणासाठी केला इशारा?
काही लोकांच्या मते शमीने पगडीचा इशारा केला. हरभजन सिंगसाठी ही कृती होती. काहींच्या मते शमीचा हा इशारा बॉलिंग कोचसाठी होता. शमीने स्वत: हा भ्रम दूर केला. हा इशारा कोणासाठी केला होता? त्या बद्दल शमीने सांगितलं. टीम इंडियाचा हा धाकड गोलंदाज म्हणाला की, “त्याने हा इशारा टीम इंडियाचे गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे यांच्याकडे पाहून केला” त्याने डोक्यावर चेंडू रगडला. मॅच संपल्यानंतर शुभमन गिलने सुद्धा त्यावर स्टेमेंट केलं. “शमीचा हा इशारा आमच्या गोलंदाजी कोचसाठी होता. कारण त्यांच्या डोक्यावर एकही केस नाहीय” असं गिल म्हणाला.