काय ते इथेच…! हार्दिक पंड्याला ज्या मैदानात डिवचलं, तिथेच त्याच्या नावाचा होतोय जयघोष Watch Video

आयपीएल स्पर्धेत हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोपवल्यानंतर क्रीडाप्रेमींच्या रडारवर आला होता. रोहित शर्माला दूर करत त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली. दरम्यान हार्दिक पंड्याला डिवचण्याची एकही संधी चाहत्यांनी सोडली नाही. आता त्याच्याच नावाचा जयघोष होत आहे.

काय ते इथेच...! हार्दिक पंड्याला ज्या मैदानात डिवचलं, तिथेच त्याच्या नावाचा होतोय जयघोष Watch Video
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 6:24 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा सिंहाचा वाटा आहे. दक्षिण अफ्रिकेला पाच षटकात 30 धावांची गरज होती. यात हार्दिक पांड्याने दोन षटकं टाकली. तसेच दोन महत्त्वाचे विकेट्स घेतल्या. यामुळे टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सुकर झाला. 17वं षटक टाकताना हार्दिक पंड्याने पहिल्याच चेंडूवर क्लासेनची विकेट घेतली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकन संघ बॅकफूटवर गेला. तसेच फक्त चार धावा दिल्या. त्यानंतर शेवटचं षटक पुन्हा एकदा हार्दिक पंड्याच्या हाती सोपवण्यात आलं. यावेळी पहिल्याच चेंडूवर घातक अशा मिलरला बाद केलं आणि सामना आपल्या पारड्यात झुकवला. ही दोन षटकं भारताच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी हार्दिक पंड्याला डिवचणारे आता त्याचं कौतुक करताना दिसत आहे. वानखेडे आणि मरिन ड्राईव्हवर जमलेला जनसमुदाय हार्दिका पंड्याचा जयघोष करत आहे. त्यामुळे चाहत्यांचं वेगळ रुप पाहायला मिळालं आहे. आयपीएलमध्ये जितका अपमान झाला त्याच्या दुप्पट कौतुकास पात्र ठरला आहे.

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला दूर करण्यात आलं होतं. त्यानंतर हार्दिक पंड्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंबई इंडियन्सचे आणि खासकरून रोहित शर्माचे फॅन्स नाराज झाले होते. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे हार्दिक पंड्याला डिवचलं जात होतं. त्याचा फॉर्म पाहता त्याला टी20 वर्ल्डकप संघातही घेऊ नये असा सूर होता. मात्र या सर्वांवर हार्दिक पंड्या भारी पडला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी केली. तसेच टीकाकारांची तोंड कामगिरीने बंद केली. ज्या वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांनी डिवचल होतं त्याच मैदानावर आता त्याच्या नावाचा जयघोष होत आहे.

भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर 17 वर्षांनी आणि आयसीसी चषकावर 11 वर्षांनी नाव कोरलं आहे. 2007 साली भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा जेतेपद जिंकलं होतं. त्यानंतर आता 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. भारताने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अफ्रिकन संघाला फक्त 169 धावा करता आल्या. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकत जेतेपदावर नाव कोरलं.

Non Stop LIVE Update
सोमय्यांचा हातोडा त्यांच्याच पायावर, आरोपांनंतर वायकरांना क्लिनचीट
सोमय्यांचा हातोडा त्यांच्याच पायावर, आरोपांनंतर वायकरांना क्लिनचीट.
जरांगेंचा अल्टिमेटम अन काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?
जरांगेंचा अल्टिमेटम अन काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?.
शिवसेना,राष्ट्रवादीवर सुप्रीम फैसला, विधानसभेच्या आधी काय येणार निर्णय
शिवसेना,राष्ट्रवादीवर सुप्रीम फैसला, विधानसभेच्या आधी काय येणार निर्णय.
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.