IND vs ENG T 20 Series: कसोटी विजयानंतर इंग्लंडचा कॅप्टन Jos Buttler चा टीम इंडियाला इशारा
IND vs ENG T 20 Series: इंग्लंडच्या अन्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणे जोस बटलरने (Jos buttler) सुद्धा काल कसोटी विजयाचा (England Test Win) आनंद साजरा केला. तो सुद्धा आपल्या टीव्ही सेट समोर बसला होता.
मुंबई: इंग्लंडच्या अन्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणे जोस बटलरने (Jos buttler) सुद्धा काल कसोटी विजयाचा (England Test Win) आनंद साजरा केला. तो सुद्धा आपल्या टीव्ही सेट समोर बसला होता. 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करुन इंग्लंडने ऐतिहासिक विजय मिळवला. बटलरने लगेच आपल्या कसोटी संघातील सहकाऱ्यांना या विजयाबद्दल शुभेच्छा संदेश पाठवला. जोस बटलर इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 संघाचा नवीन कर्णधार आहे. इयॉन मॉर्गनने (Eoin Morgan) मागच्या आठवड्यात निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने जोस बटलरची वनडे आणि टी 20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. इंग्लंडच्या संघाने मिळवलेला हा कसोटी विजय टी 20 संघाला प्रेरित करेल, असं बटलरने म्हटलं आहे. इंग्लंडची ही विजयी लय कायम ठेवण्याचा आपण आपल्याबाजूने पूर्ण प्रयत्न करु, असं बटलरने म्हटलं आहे. एकप्रकारे त्याने भारतीय संघाला इशारा दिला आहे. उद्यापासून भारत आणि इंग्लंडमध्ये टी 20 सीरीज सुरु होत आहे.
“एजबॅस्टनवर इंग्लंडने जे केलं, ते पाहणं खरोखरच अविश्वसनीय आहे. कसोटी संघाकडून प्ररेणा घेऊन, इंग्लंडचा हा विजयी प्रवास पुढे सुरु ठेऊ” असं बटलरने म्हटलं आहे.
जोस बटलर सध्या तुफान फॉर्म मध्ये
जोस बटलर सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं. नेदरलँड विरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याची बॅट तळपली होती. त्याने यंदाच्या आय़पीएल सीजनमध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्याच्या कामगिरीच्या बळावरच राजस्थानच संघ दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला. त्यांना फायनल जिंकता आली नाही. गुजरात टायटन्सने त्यांना नमवून यंदाच्या सीजनचं जेतेपद पटकावलं. नेदरलँड विरुद्धच्या सीरीजमध्ये पहिल्या वनडेत इंग्लंडने 498 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्या सामन्यात बटलरने 70 चेंडूत नाबाद 162 धावा फटकावल्या होत्या. तेव्हापासूनच बटलरला कॅप्टन बनवण्याच्या आणि कसोटीत ओपनिंगला उतरवण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
बटलर किती वनडे आणि टी 20 सामने खेळलाय?
जोस बटलरने 2011 साली टी 20 मध्ये डेब्यु केला. 2012 मध्ये तो पहिला वनडे सामना खेळला. बटलर इंग्लंडसाठी आतापर्यंत 151 वनडे सामने खेळला आहे. त्याने 41.20 च्या सरासरीने 4120 धावा केल्या आहेत. त्याने 10 शतकं झळकावली आहेत. इंग्लंडसाठी तो 88 टी 20 सामने खेळलाय. 141.20 च्या स्ट्राइक रेटने त्याने 2140 धावा केल्या आहेत.