दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर ही या खेळाडूने जिंकले सर्वांचे मन
आयपीएलची २०२४ ची सुरुवात धमाकेदार झाली आहे. सुरुवातीच्याच सामन्यांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यामध्ये दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण असं असलं तरी एका खेळाडूने आपल्या कामगिरीने सगळ्यांचंच मन जिंकलं आहे.
आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पंजाब किंग्ज विरुद्ध 4 विकेट्सने पराभवचा सामना करावा लागला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 174 धावा केल्या होत्या. ज्याच्या प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघाने सहज लक्ष्य गाठले. ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्ससाठी पुनरागमन केले. तर अभिषेक पोरेलने चमकदार कामगिरी केली. आता दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आंब्रे यांनी अभिषेक पोरेलचे कौतूक केले आहे.
प्रवीण आंब्रे काय म्हणाले
प्रवीण आंब्रे म्हणाले की, सुरुवात हवी तशी झाली नाही. प्रत्येक संघाला विजयाने सुरुवात करायची असते. पण या सामन्यात अनेक सकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या. आमचा फलंदाजीचा आत्मा चांगला होता. आम्ही चांगल्या स्थितीत होतो पण मधल्या षटकांमध्ये सतत विकेट गमावल्यामुळे आम्हाला त्याचा धावसंख्या उभारण्यात फटका बसला.
अभिषेक पोरेल याची कामगिरी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. तो क्रीजवर आला आणि त्याने 300 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने आम्हाला 170 पेक्षा जास्त धावसंख्येपर्यंत नेले. वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या घोट्याला दुखापत झाल्याने दिल्लीला मोठा धक्का बसला. संघाने सॅम कुरनसह तीन झेल सोडले. सॅम कॅरेनने 63 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली.
दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आंब्रे म्हणतात की, मैदानावरील खराब कामगिरीमुळे त्यांच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आणि यादरम्यान त्यांचा एक प्रमुख वेगवान गोलंदाजही जखमी झाला, ही त्यांच्या मोहिमेची चांगली सुरुवात नव्हती.
शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी
अभिषेक पोरेलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध उत्कृष्ट खेळी केली. त्याने उत्तम फलंदाजीचे उदाहरण दिले. इतर फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अंतिम षटकांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने पोरेलला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आणले. या 25 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने 10 चेंडूत नाबाद 32 धावा करत आपल्या संघाला नऊ विकेट्सवर 174 धावापर्यंत पोहोचवले.