इंग्लंडवर विजयानंतर भारतीय प्रेक्षकांनी एकत्र गायलं वंदे मातरम, अंगावर शहारा आणणारा VIDEO

India vs England : भारतीय संघाने इंग्लंडवर विजयासह सलग सहाव्या विजयाची नोंद केली आहे. भारतीय संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघ सध्या वर्ल्डकप मध्ये चांगली कामगिरी करत आहे. रोहित शर्मासह सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

इंग्लंडवर विजयानंतर भारतीय प्रेक्षकांनी एकत्र गायलं वंदे मातरम, अंगावर शहारा आणणारा VIDEO
world cup 2023
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 1:44 PM

World cup 2023 : विश्वचषक 2023 च्या सामन्यात भारताने रविवारी इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. भारतीय संघ खुप मोठी धावसंख्या उभी करु शकला नव्हता. त्यामुळे गोलंदाजांची जबाबदारी वाढली होती. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या चमकदार कामगिरीने भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. भारताच्या विजयानंतर सामना पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी एकत्र वंदे मातरम हे गीत गायले. यादरम्यान, एक नेत्रदीपक लाइट शो करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण स्टेडियम दिव्यांनी उजळून निघाले होते. भारताचा या स्पर्धेतील हा सलग सहावा विजय आहे.

भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. भारतीय फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. भारताच्या विकेट पडू लागल्याने भारत २०० रन तरी करतो की नाही असा प्रश्न भारतीयांना पडला होता. रोहित शर्माच्या ८७ धावांची शानदार खेळी केली.

रोहित शर्माने 101 चेंडूत 87 धावा केल्या. सूर्यकुमार यादवच्या 49 धावांच्या खेळीमुळे भारताला 50 षटकांत 229 धावा करता आल्या. भारताने 9 विकेट गमावल्या. केएल राहुलने 39 धावांची खेळी केली.

इंग्लंड 129 धावांवर ऑलआऊट

230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी पीचवर टिकूच दिले नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी सुरुवातीलाच इंग्लंडचे कंबरडे मोडले. शमीने 22 धावा देत 4 विकेट घेतले. बुमराहने 32 धावा देत तीन विकेट घेतले. कुलदीप यादवने दोन आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. इंग्लंडचे फलंदाज 34.5 षटकात केवळ 129 धावा करू शकले.

या पराभवामुळे इंग्लंडची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. यासोबतच भारत 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या विजयानंतर स्टेडियममध्ये शानदार लाइट शो करण्यात आला. याने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....