कोहली, सूर्या, राहुलला रिझल्ट मिळताच उमेशही ‘या’ मंदिरात पोहोचला दर्शनासाठी, WTC फायनलमध्ये धमाल

विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलने 'या' मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर मैदानावर फॉर्म दाखवला. कोहलीची 3 वर्षांची प्रतिक्षा संपली होती.

कोहली, सूर्या, राहुलला रिझल्ट मिळताच उमेशही 'या' मंदिरात पोहोचला दर्शनासाठी, WTC फायनलमध्ये धमाल
2013 मध्ये उमेश यादव आणि तान्याच लग्न झालं. उमेश 2021 मध्ये पहिल्यांदा पिता बनला. त्याच्या पत्नीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. आता पुन्हा एकदा उमेश एका गोंडस मुलीचा पिता बनलाय.
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 1:02 PM

भोपाळ : सध्या टीम इंडियातील खेळाडू क्रिकेट बरोबर देवदर्शनही घेतायत. देव देशर्नाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. आता यामध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा समावेश झालाय. उमेश यादवनेही नुकतच देवदर्शन घेतलं. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलनंतर उमेश यादव महाकालच्या दर्शनासाठी पोहोचला. सोमवारी तो महाकालच्या भस्म आरतीमध्ये सहभागी झाला. त्यानंतर महाकालवर रुद्रभिषेक केला. देव दर्शनानंतर आता उमेश यादव सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपममध्ये धमाल करण्यासाठी सज्ज आहे.

उमेश यादवच्या आधी मागच्या काही दिवसात इथे येऊन टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंनी दर्शन घेतलं. दर्शनानंतर तिन्ही बॅट्समननी धावा केल्या.

शतकाआधी विराटकड़ून दर्शन

विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात शतक ठोकून 3 वर्षांपासूनचा आपला दुष्काळ संपवला. तो 186 धावांनी शानदार इनिंग खेळला. 2019 मध्ये त्याने शेवटच शतक झळकवल होतं. अहमदाबाद कसोटीआधी विराट कोहलीने महाकालच दर्शन घेतलं होतं.

सूर्यानेही दर्शनानंतर ठोकल्या धावा

इंदोर कसोटीत पराभव झाल्यानंतर अहमदाबादला रवाना होण्याआधी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत महाकालच्या शरणात गेला. कोहलीच्या आधी सूर्या सुद्धा इथे जानेवारीत आला होता. न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या T20 आधी त्याने महाकालच दर्शन घेतलं होतं. त्यानंतर किवी टीम विरुद्ध त्याने 47 धावा ठोकल्या. राहुल फॉर्ममध्ये परतला

मागच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये ओपनर केएल राहुल सुद्धा महाकालच्या दर्शनाला आला होता. पत्नी आशियासोबत त्याने दर्शन घेतलं. महाकालच्या दर्शनानंतर राहुलने सुद्धा आपला फॉर्म दाखवलाय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात त्याने नाबाद 75 धावांची मॅचविनिंग खेळी साकारली. आता उमेश यादवकडूनही अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. WTC फायनलमध्ये उमेशकडून चमकदार परफॉर्मन्सची अपेक्षा आहे. जेणेकरुन टीमला फायदा होईल.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.