#ViratKohli: Wisden इंडियाने खास टि्वट करुन विराटच्या कॅप्टनशिपला केला सलाम

विराट आक्रमक स्वभावाचा असल्यामुळे त्याच्याबरोबर अनेक वाद जोडलं जाणं, यात अजिबात काही नवीन नाही. परवाच केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्यादिवशी पंचांनी DRS वापरुन एल्गरला नाबाद ठरवलं म्हणून त्याने आपला राग व्यक्त केला होता.

#ViratKohli: Wisden इंडियाने खास टि्वट करुन विराटच्या कॅप्टनशिपला केला सलाम
Virat Kohli - Rahul Dravid
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 8:02 PM

मुंबई: विराट कोहलीने (Virat kohli resign) टी-20 पाठोपाठ कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले आहे. विराटने आज संध्याकाळी अचानक तडकाफडकी हा निर्णय जाहीर केला. विराटच्या या निर्णयामुळे देशभरातील त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, की असं काय घडलं? की विराटने कसोटीचे कर्णधापदही सोडलं. विराटला वनडेच्या कॅप्टनशिपवरुन हटवून त्याच्याजागी रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड करण्यात आली. त्यावरुन बराच वाद झाला होता. कारण विराटला वनडे ची कॅप्टनशिप सोडायची नव्हती.

त्याने तसं निवड समितीला सांगितलं होतं. पण मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नको, अशी बीसीसीआयची भूमिका होती. त्यामुळे विराटला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. विराट आक्रमक स्वभावाचा असल्यामुळे त्याच्याबरोबर अनेक वाद जोडलं जाणं, यात अजिबात काही नवीन नाही. परवाच केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्यादिवशी पंचांनी DRS वापरुन एल्गरला नाबाद ठरवलं म्हणून त्याने आपला राग व्यक्त केला होता.

हे सर्व जरी असलं तरी विराट खेळाडू म्हणून नक्कीच उजवा आहे. त्याची कामगिरी, आकडेच सर्व काही बोलतात. विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विसडेन इंडियाच्या विराटच्या सम्मानार्थ एक खास टि्वट केलं आहे. त्यात त्याच्या कामगिरीचे आकडे सांगितले आहेत.

भारतीय कसोटी कर्णधार म्हणून तो सर्वाधिक सामन्यात खेळला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वाधिक कसोटी सामने जिंकले. विजयाची टक्केवारी त्याच्याच नेतृत्वाखाली जास्त आहे. एका मोठ्या कॅप्टनशिपचा कार्यकाळ संपला असं टि्वटमध्ये लिहिताना विसडेन इंडियाने टाळ्या वाजवतानाच, ह्दय मोडल्याचा इमोजी पोस्ट केला आहे.

(After virat kohli resign from test captainship wisden india special tweet)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.