Ind vs nz test series : दुसऱ्या कसोटीत कुणाला बाहेर बसावं लागणार? कोण मैदानात असणार?
श्रेयस अय्यरच्या पहिल्याच इनिंगनं पुढच्या मॅचमध्ये कोण बाहेर बसणार? कोण खेळणार? याचा सस्पेन्स वाढवला आहे. श्रेयस अय्यरला टीम मध्ये ठेवण्यासी चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य राहणेला बाहेर बसावं लागणार का? हेही पाहणं महत्वाचं आहे.
मुंबई : श्रेयस अय्यरच्या पहिल्याच इनिंगनं पुढच्या मॅचमध्ये कोण बाहेर बसणार? कोण खेळणार? याचा सस्पेन्स वाढवला आहे. पहिल्या कसोटीत आराम घेतलेला कर्णधार विराट कोहीलीही दुसऱ्या सामन्यात संघात परतणार आहे. त्यावेळी कुणाला बाहेर बसावं लागणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय. अर्थात कर्णधार असल्यामुळे विराट मैदानात उतरणार.
टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढली
अर्थात पहिल्याच इनिंगमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला टीममधून बाहेर बसवण्याचा विचार करणंही चाहत्यांचा रोष वाढवण्यासरख होईल. त्यामुळे टीम मॅनेजमेंट याचाही विचार करेल. सलामीच्या जोडीतील कुणाला बाहेर बसवण्याचीही शक्यता फार कमी आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला टीम मध्ये ठेवण्यासाठी चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य राहणेला बाहेर बसावं लागणार का? हेही पाहणं महत्वाचं आहे.
कानपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी तिघांची अर्धशतके
कानपूरच्या कसोटीत पहिल्या दिवशी तीन खेळाडुंनी अर्धशकं ठोकल्यानं टीम इंडियासाठी ही अतिशय सकारात्मक बाब आहे. सलामीवर शुभमन गिल अर्धशक करून बाद झाला. दिवसाअखेर श्रेयस अय्यर नाबाद 75 धावांवर खेळत होता. तर रविंद्र जडेजा नाबाद 50 धावावर. त्यामुळे उद्याच्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर आपल्या पहिल्याच कसोटीत श्रेयस अय्यर शतक ठोकणार का? याचीही उत्सुक्ता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
न्यूझीलंड पारडं फिरवणार?
आजचा दिवस भारतानं गाजवल्यानंतर उद्या न्यूझीलंड चमकदार कामगिरी करून पारडं फिरवणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण भारताच्या दौऱ्यावर आल्यापासून न्यूझीलंडच्या हाती अजूनही भोपळा आहे. त्यांना अजून एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे किमान उद्याचा दिवस तरी न्यूझीलंडसाठी चांगला ठरणार की भारताची सामन्यावर पकड मजबूत होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.