Team India | Rinku Sing, ऋतुराज दोघांना T20 मध्ये निवडणार, कधी? कुठल्या टीम विरुद्ध? असा आहे BCCI चा प्लान
Team India | अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी असा प्लान तयार केला आहे. रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड आणि IPL गाजवणाऱ्या अन्य खेळाडूंना नक्कीच संधी मिळेल.
नवी दिल्ली : वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 सीरीजसाठी दोन दिवसापूर्वी टीम निवडण्यात आली. या टीममध्ये रिंकू सिंहच नाव नसल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. IPL 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या रिंकू सिंहने दमदार प्रदर्शन केलं होतं. त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 सीरीजसाठी टीममध्ये संधी मिळेल, असं सर्वांना वाटत होतं. पण निवड समितीने रिंकूची निवड केली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.
आता मिळालेल्या नव्या माहितीनुसार, रिंकू सिंहला फार प्रतिक्षा करावी लागणार नाही. वेस्ट इंडिज नंतर होणाऱ्या पुढच्या T20 सीरीजमध्ये रिंकू सिंहचा टीम इंडियात समावेश होईल.
म्हणून रिंकू सिंहला नाही निवडलं
वेस्ट इंडिजनंतर टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध T20 सीरीज खेळणार आहे. 18, 20 आणि 23 ऑगस्टला आयर्लंड विरुद्ध 3 T20 सामन्याची मालिका होणार आहे. या सीरीजसाठी रिंकू सिंहचा टीममध्ये समावेश होऊ शकतो. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजसाठी निवड समितीला पूर्णपणे युवा संघ नको होता. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती प्रत्येक सीरीजनुसार, खेळाडूंना संधी देऊन त्यांची चाचपणी करणार आहे. कुठल्याही दीर्घ दौऱ्याआधी खेळाडूंना पुरेशी विश्रांती देण्याचा प्रयत्न असेल.
वनडेमधील किती प्लेयर T20 मध्ये खेळणार नाहीत
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रिंकू आणि अन्य खेळाडूंना आयर्लंड सीरीजमध्ये संधी मिळेल. एकाचवेळी सर्व खेळाडूंना न निवडण्याची भूमिका आहे. इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. वनडे टीममधील सात सदस्य T20 मध्ये खेळणार नाहीत. भारताच्या भविष्याच्या योजनाच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत. ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये ते खेळतील असं बीसीसीआय सूत्राने सांगितलं. ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंह यांना आयर्लंड सीरीजमध्ये संधी मिळेल. निवड समितीला टप्याटप्याने खेळाडूंची चाचपणी करायची आहे. बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीने बोर्डाला जास्तीत जास्त इंडिया ए चे दौरे आयोजित करण्याची विनंती केली आहे, जेणेकरुन जास्ती जास्त खेळाडूंची चाचपणी करता येईल.