Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navjot Singh Sidhu | पत्नीला कॅन्सर, तिसऱ्या केमोनंतर टि्वट, नवज्योत सिंग सिद्धू एकटे पडले का?

Navjot Singh Sidhu | नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीची हिम्मत वाढवण्याचा तिला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सिद्धू तुरुंगात असताना पत्नीला कॅन्सर झाल्याच समजलं.

Navjot Singh Sidhu | पत्नीला कॅन्सर, तिसऱ्या केमोनंतर टि्वट, नवज्योत सिंग सिद्धू एकटे पडले का?
Navjot Singh SidhuImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 9:12 AM

चंदीगड : प्रसिद्ध क्रिकेटपटू, मोटिवेशनल स्पीकर, कॉमेंटेटर आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्नीच्या तिसऱ्या केमो थेरपीनंतर टि्वटरवर व्हिडिओ आणि मेसेज पोस्ट केला आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांनी या मेजेसमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांच कौतुक केलय. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीची हिम्मत वाढवण्याचा तिला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्याशिवाय या मेसेजमध्ये एक अशी ओळ आहे, ज्यावरुन सिद्धू एकटे पडल्यास दिसतय.

नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 2 चा कॅन्सर आहे. यावर्षी मार्च महिन्यात विविध चाचण्यांमधून त्यांच्या पत्नीला कॅन्सर असल्याच निष्पन्न झालं. नवज्योत सिंह सिद्धू त्यावेळी पतियाळाच्या सेंट्रल कारागृहात होते. 1988 सालच्या रोड रेज प्रकरणात त्यांना एकवर्ष तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सिद्धू यांनी त्यांच्या संदेशात काय म्हटलय?

“तिचा तिसरा केमो झाला. दृढनिश्चयी माणसासाठी काही अशक्य नाहीय. तिच्या पोलादी खंबीरपणाला डॉ. रुपिंदर बात्रा यांची साथ मिळाली. काहीतरी कर्माच कनेक्शन आहे. मी तुरुंगात असताना, मला प्राणघातक फुफ्फुसाच्या रक्ताभिसरणा संबंधित आजार झाला होता. त्यावेळी त्यांनी मला वाचवलं. चांगल्या दिवसात भरपूर मित्र तुमच्यासोबत असतात. पण संकटकाळात त्या वीसापैकी एकही सोबत नसतो” अशी खंत देखील सिद्धू यांनी बोलून दाखवलीय.

ऑल वेल?

सिद्धू यांनी व्हिडिओसोबत ही पोस्ट केलीय. व्हिडिओमध्ये त्यांची पत्नी बेडवर असून सिद्धू आणि डॉक्टर तिच्या बाजूला उभे आहेत. सिद्धू तिला ऑल वेल? म्हणून विचारतात, त्यावर ती येस असं उत्तर देते. ‘तुमच्यापेक्षा मला जास्त त्रास होतोय’

नवज्योत कौर यांनी टि्वटरवरुन त्यांना कॅन्सरच निदान झाल्याची माहिती दिली होती. “जो गुन्हा केलाच नाही, त्यासाठी नवज्योत सिंह सिद्धू तुरुंगात आहेत. यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना माफ करा. तुरुंगाबाहेर प्रत्येकदिवस मी तुमची वाट पाहतेय. तुमच्यापेक्षा मला जास्त त्रास होतोय” असं नवज्योत कौर यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.