Team India Test Captaincy : बदलाची हीच वेळ, पण Rohit Sharma च्या जागी कॅप्टनशिपसाठी कोण योग्य?

Indian Cricket Team: रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पराभव झाला म्हणून नवीन कॅप्टन नकोय. तर नव्या युगात प्रवेश करताना बदलाची हीच योग्य वेळ आहे.

Team India Test Captaincy : बदलाची हीच वेळ, पण Rohit Sharma च्या जागी कॅप्टनशिपसाठी कोण योग्य?
Rohit Sharma Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 9:07 AM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर पुन्हा एकदा टीम इंडियात बदलाची चर्चा सुरु झाली आहे. WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी दारुण पराभव केला. त्यामुळे टीम इंडियात बदल करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. काही सिनियर खेळाडूंच्या टीममधील स्थानाला धोका आहे. मागच्या काही वर्षात मोठ्या टुर्नामेंटमधील पराभवानंतर लगेच बदल झालेले नाहीत. घाईगडबडीत कुठलाही निर्णय झालेला नाहीय. पण काहीवेळा निर्णय घेताना खूपच उशिर झाल्याच सुद्धा दिसलय.

T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियात बदल दिसला. रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवलं नाही. पण T20 च नेतृत्व हार्दिक पांड्याकडे दिलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सिनियर खेळाडू आता टी 20 संघात दिसत नाहीत. लवकरच कसोटी क्रिकेटमध्येही असेच काहीसे बदल दिसू शकतात.

नव्या कॅप्टनचा शोध आवश्यक ?

फक्त टीम हरलीय म्हणून रोहित शर्माच्या कॅप्टनशिपबद्दल प्रश्न नाहीय. हे एक कारण आहे. पण दुसरा मुद्दा त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे रोहितच वाढत वय. रोहित शर्मा आता 36 वर्षांचा आहे. टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी सुद्धा तो फिट नसतो. पुढच्या टेस्ट चॅम्पियनशिप सायकलसाठी नव्या कॅप्टनची आवश्यकता आहे.

चांगला पर्याय कोण?

टेस्ट फॉर्मेटमध्ये चांगला कॅप्टन कोण ठरु शकतो? केएल राहुलला संधी दिली. पण त्याचा फायदा झाला नाही. जसप्रीत बुमराहला सुद्धा संधी दिली. पण फिटनेसमुळे त्याच्या टेस्ट करीयरवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालय. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा हे लॉन्ग टर्म पर्याय असू शकत नाहीत. अशावेळी 3 नावं डोळ्यासमोर येतात.

त्याच्या बाबतीत जमेच्या दोन बाजू

श्रेयस अय्यर रोहितची जागा घेऊ शकतो. सध्या तो दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे WTC फायनलमध्ये दिसला नाही. त्याचं टीममध्ये स्थान पक्क आहे. वनडे आणि टेस्टमध्ये तो मीडिल ऑर्डरमध्ये टीमच भविष्य आहे. श्रेयस अय्यरच्या बाबतीत दोन जमेच्या बाजू आहेत. एक म्हणजे त्याचं वय तो आता 28 वर्षांचा आहे. त्याशिवाय कॅप्टनशिपचा अनुभव. श्रेयस आयपीएलमध्ये केकेआरच नेतृत्व करतो. मागच्या तीन वर्षापासून त्याची दमदार कामगिरी

ऋषभ पंत सध्या अपघातामुळे मैदानापासून लांब आहे. पण टेस्ट क्रिकेटमध्ये ऋषभने नेहमीच चांगलं प्रदर्शन केलय. मागच्या तीन वर्षापासून तो टीमचा बेस्ट कीपर आणि फलंदाज आहे. तो तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. पण वनडे आणि टेस्ट फॉर्मेटमध्ये तो बरीच वर्ष टीमचा भाग राहू शकतो. त्याच वय श्रेयसपेक्षा पण कमी आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.