WTC Final : भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटसह विल्यमसनही भावूक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

न्यूझीलंडच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात भारताला आठ विकेट्सने पराभूत करत विजय मिळवला. या विजयासह भारताचा विश्वविजेता होण्याचं स्वप्नही न्यूझीलंडने तोडलं पण कर्णधार विल्यमसनच्या एक कृतीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

WTC Final : भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटसह विल्यमसनही भावूक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस
kane virat
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 4:31 PM

साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यात भारत पराभूत झाला आणि करोडो भारतीयांची मनं पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे तुटली. विराट कोहलीने (Virat Kohli) एखाद्या महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धेतील ट्रॉफी जिंकण्याचं चाहत्यांच स्वप्नही अधुरं राहिल. न्यूझीलंड संघाला कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) विजय मिळवून देत विश्वविजेता बनवलं. पण सामन्यानंतर केन आणि विराटकडून दाखवण्यात आलेल्या खेळाडू वृत्तीने सर्वांचीच मनं जिंकली दोघांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. (After WTC Final Match Kane Williamson And Virat Kohli Hug Photo Went Viral)

पावसाच्या व्यत्ययामुळे पाच दिवसांचा सामना सहाव्या राखीव दिवशीही खेळवावा लागला. सुरुवातीपासून अटीतटीचा होणारा सामना कधी न्यूझीलंडच्या तर कधी भारताच्या तर कधी न्यूझीलंडच्या पारड्यात झुकत होता. मात्र अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजाना मोठे लक्ष्य न देता आल्याने 139 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ दोन विकेट गमावत सर केले आणि विजयश्री मिळवला. सामन्यानंतर ‘भारतीय कर्णधार विराट कोहलीने देखील न्यूझीलंडचा संघ चांगला खेळला त्यामुळे ते विजयास पात्र आहेत’ असं म्हणाला.

खेळाडू वृत्ती दाखवणारा फोटो व्हायरल

सामना संपताच मैदानावर उपस्थित केन विल्यमसनने कोणतही दमदार सेलेब्रेशन न करता केवळ सहखेळाडू रॉस टेलरला मिठी मारुन हसला. तसेच प्रतिस्पर्धी कर्णधार विराट कोहलीलाही केनने मिठी मारुन दोघांनीही एकमेकांचे कौतुक केले. याच मिठी मारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील सर्वांत सुंदर फोटो म्हटला जात आहे.

हे ही वाचा :

WTC Final 2021 : म्हणून अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला, विराटने सांगितली 2 कारणं!

WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला…!

WTC Final 2021 : ‘चॅम्पियन’ न्यूझीलंड मालामाल, भारताचाही खिसा गरम, पाहा कुणाला किती बक्षिसाची रक्कम मिळाली…

(After WTC Final Match Kane Williamson And Virat Kohli Hug Photo Went Viral)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.