झिम्बाब्वे नंतर भारत या देशासोबत खेळणार सीरीज, सीनिअर खेळाडूंचे पुनरागमन होणार

भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्या झालेल्या दोन सामन्यात दोघांनी एक-एक सामना जिंकला आहे. आता या सीरीजनंतर भारत आणखी एका देशासोबत वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. कधी असेल ही मालिका जाणून घ्या.

झिम्बाब्वे नंतर भारत या देशासोबत खेळणार सीरीज, सीनिअर खेळाडूंचे पुनरागमन होणार
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 6:50 PM

: टीम इंडिया सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. जिथे टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. आता आणखी तीन सामने बाकी आहेत. यानंतर भारतीय संघाला याच महिन्यात आणखी एक मालिका खेळायची आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणारे खेळाडू या मालिकेचा भाग असतील अशी माहिती आहे. तसेच T20 मध्ये भारताचा कायम कर्णधार कोण असेल हे देखील समोर येणार आहे.

T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकणारे बहुतांश भारतीय खेळाडूंना सध्या बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केलीये. आता उर्वरित भारतीय खेळाडू लवकरच संघात परततील. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा टी-20 सामना 10 जुलै रोजी होणार आहे. 13 आणि 14 जुलै रोजी शेवटचे दोन सामने होणार आहेत. ही सीरीज संपताच जुलैमध्येच भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका होणार आहे. यासाठी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

भारत विरुद्ध श्रीलंका मालिका

भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी होणार असल्याची माहिती आहे. दुसरा सामना 28 जुलै तर, तिसरा आणि शेवटचा सामना 30 जुलैला होणार आहे. या मालिकेत फक्त तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. सध्या झिम्बाब्वे मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे आहे. श्रीलंका मालिकेत हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून पुनरागमन करू शकतो. त्यासोबतच जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल देखील पुनरागमन करताना दिसतील.

ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका

2 ते 7 ऑगस्ट दरम्यान श्रीलंका आणि भारत यांच्यात तीन एकदिवसीय सामनेही होणार आहेत. ही एकदिवसीय मालिका महत्त्वाची असणारे. कारण विराट कोहली, रोहित शर्मा या मालिकेत पुनरागमन करू शकतात. त्यासाठीचा संघही अद्याप जाहीर झालेला नाही. रोहित शर्मा या मालिकेचे नेतृत्व करू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत आयोजित केली जाणार आहे, जी एकदिवसीय स्वरूपात असेल. या मालिकेपासून चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी सुरू करण्याचा टीम इंडिया आणि बीसीसीआयचा प्रयत्न असेल.

राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.